गणितीय कूट रचनेचे मर्म (Concept of Mathematical Coherence)

0
शास्त्रीय संगीताविषयी आणि गणिताविषयी मालिका सुरू करण्याचे उद्दीष्ट हे आहे की काही अमूर्त सौंदर्य कल्पनांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर व्हावा. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच गणिताविषयी मनात...

आंबोळगड – प्रतिगोवा !

आंबोळगड हे आमचे गाव कोकणाच्या राजापूर तालुक्यात रत्नागिरीपासून पन्नास किलोमीटर आणि राजापूरपासून बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते तीन बाजूंनी समुद्राच्या कुशीत वसले आहे. एकीकडे डोंगरकड्याशी कठोर झुंजणाऱ्या सागरलाटा आणि दुसरीकडे वाळूशी पदन्यास करणाऱ्या सागरलाटा… दोन्ही विभ्रम एकाच ठिकाणाहून दिसतात. निसर्गराजाची अशी नानाविध रूपे तासन् तास न्याहाळत बसावे, असे आहे हे आंबोळगड गाव. गावाचे क्षेत्रफळ दोनशे एकर आहे. गावात शिवकालीन इतिहासाची शौर्य परंपरा, गौरवशाली संस्कृती यांची यशोगाथा सांगणारा पुरातन किल्ला आहे. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर व तोफा आहेत. तटबंदी छोटी असली तरी मजबूत आहे. त्या किल्ल्यामुळेच गावाला आंबोळगड असे नाव पडले...

अंगण (Courtyard)

एखाद्या शब्दासरशी आपल्या मनात रूप, रंग, गंध, नाद; अशा अनेक संवेदना जाग्या होतात. ओल्या फुलाचे परागकण हाताला चिकटून यावेत तशा आठवणी जाग्या होतात. ‘मातीचा वास आला!’ या गद्य शब्दात किती सुगंध, उल्हास साठला आहे. सध्याच्या दिवसात किती असोशीने आपण त्या वासाची वाट पहात आहोत. अशाच संवेदना वेगवेगळ्या जागांशी, घरांशी संबधित असतात. आजच्या लेखात मंजूषा देशपांडे यांनी त्यांनी पाहिलेल्या आणि त्यांच्या मनातल्या अंगणांविषयी लिहिले आहे...

आवाहन

लोकप्रिय लेख

इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)

इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...

व्यक्ती

संस्था

वैभव

गावगाथा

सद्भावनेचे व्यासपीठ

मोगरा फुलला

मराठीकारण

शिक्षकांचे व्यासपीठ

मंथन

Youtube व्हिडियो

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प

लोकशाही सबलीकरण अभियान