महाराष्ट्रातील प्रज्ञाप्रतिभा आणि चांगुलपणा ह्याचे नेटवर्क!


संस्कृतीचा ठेवा हा त्या संस्कृतीला वैभवाचे साज चढवणाऱ्या व्यक्ती, संस्था, स्थळे, परंपरा, उत्सव, कला इत्यादींमधून साकारतो. संस्‍कृती केवळ गडकिल्‍ल्यासारख्‍या वास्‍तूंनी किंवा चालीरितींनी आकार घेत नाहीत. तर जागोजागच्‍या धडपड्या व्‍यक्‍ती, त्‍यांनी उभारलेले संस्‍थात्‍मक कार्य आणि सामूहिकपणे घडवलेल्‍या-वाहून आणलेल्‍या वैभवाच्या खुणा असा विस्‍मयकारी अनुभव म्हणजे संस्कृति. महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जतन करण्याचा पहिलाच व आगळावेगळा उपक्रम म्हणजे "थिंक महाराष्ट्र डॉट कॉम". थिंक महाराष्ट्र प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. कारण या प्रकल्पात महाराष्ट्रातील चांगुलपणा आणि प्रज्ञाप्रतिभा यांच्यामध्ये दुवा साधायचा आहे. त्या दृष्टीने वेबपोर्टलवर तीन प्रकारे माहितीचे संकलन केले जाते.

व्यक्ति

GIFVyakti.gifसर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांकडे दुर्लक्ष होते व लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून घेतली जातात. सामान्यांमध्ये दडलेली असामान्य ऊर्जा व्यक्त व्हावी व सर्वदूर पोहोचावी ह्यासाठी अप्रसिद्ध पण कर्तृत्ववान मंडळींची माहिती 'थिंक महाराष्ट्र'वर संकलित केली जाते.

संस्था

GIFVaibhav.gifमहाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे गांधीजी म्हणत. महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे असून व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. भोवतालच्या बजबजपुरीजन्य परिस्थितीत लोकांमध्ये आश्वासकता निर्माण व्हावी व सामाजीक कार्यातून व्यक्त होणारा "निरपेक्ष चांगुलपणा" अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी थिंक ग्लोबल व्यासपिठ ऊपलब्ध करते!

वैभव

GIFVaibhav.gifमहाराष्ट्राच्या गावोगावी वेगवेगळी सांस्कृतिक वैशिष्ट्यं असून ते सारे वैभव डॉक्युमेन्टेशन अभावी दुर्लक्षीत आहे. भावी पिढ्यांना व अभ्यासकांना ह्या अनंत गतकतृत्वाचे समग्र दर्शन व्हावे व अनुभवाचा फायदा व्हावा याच उद्देशाने 'वैभव' विभागात गावांची माहिती, कला आणि कलाकार, प्रथा, परंपरा, किल्ले, बाजार, खाद्यसंस्कृती, वन्यवैभवअशा विविध प्रकारची माहिती संकलित करून मांडली जाते.