Home Tags Konkan

Tag: Konkan

सामाजिक दायित्व जपणारी दापोली अर्बन बँक (Dapoli Bank – An institute that belongs to...

दापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस्‌ कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली !

दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)

दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...

जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor with heart)

डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते...

विसापूर – दापोलीच्या छायेत

विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...

नाण्यांच्या माध्यमातून अर्थसाक्षरता – जयवंत जालगावकर (Jaywant Jalgaonkar – Bankman loves coins and liquor...

दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँकेच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी आहेत. जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या अशा पाचशेदहा बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत...

आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)

विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...

आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)

प्राचीन दाभ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले !...

बिळवसचे सातेरी देवीचे जलमंदिर (Sateri Temple surrounded by water at Bilwas-Konkan)

0
कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरांपैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे - त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. ती मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी उभारले आहे !...

कोकण आणि कॅलिफोर्निया ! (Konkan And California)

कोकण आणि कॅलिफोर्निया अशी तुलना हल्ली होत नाही. पूर्वी म्हणजे ज्यावेळी कोकणाला उघड उघड दरिद्री संबोधले जाई, त्या काळी नेहमी कोकणासमोर कॅलिफोर्नियाचा आदर्श ठेवला जात असे...
-devrukh-nature

निसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh)

देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे. देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते...