Home Authors Posts by संदीप परांजपे

संदीप परांजपे

5 POSTS 0 COMMENTS
संदीप प्रभाकर परांजपे पुण्याचे. त्यांना बकावूल्फ, बजाज ऑटो, फिनोलेक्स इंडस्ट्री, हायप्लेसेस मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी केलेल्या बेचाळीस वर्षे कामाचा अनुभव आहे. सह्याद्री व हिमालयात भटकंती हा त्यांचा छंद. त्यांनी मोटर सायकलवरून तेरा हजार किलोमीटर भारतभ्रमण व भारतातील पाचशेहून अधिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी चिपळूणजवळील गोवळकोट किल्ल्याचा अभ्यास करून त्यावर झालेली लढाई उजेडात आणली. ते या प्रकारचे संशोधन व कार्यकर्त्यांना तत्संबंधी मार्गदर्शन करतात, व्याख्याने देतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल विश्वकोशासाठी किल्ले व भारतात आलेले परकीय प्रवासी या विषयांवर; तसेच, दुर्गविषयक लेखन केले आहे. ते ‘गुगल अर्थ’वर भारतातील अठ्ठावीसशे किल्ल्यांचे मॅपिंग करत आहेत.

अप्रसिद्ध रामगड (रामदुर्ग)

‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...

प्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच ! (Panhalekaji – Fort with many names)

दापोली तालुक्यातील दाभोळ या जुन्या बंदरातून मालाची आयातनिर्यात मोठ्या प्रमाणात अनेक शतके होत आलेली आहे. बंदरापर्यंत मालाची नेआण पश्चिम घाटापासूनच्या विविध भूप्रदेशांतून नदीमार्गानेदेखील होत असे. त्या मार्गांवरील वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधले. प्रणालक ऊर्फ पद्मनाभ ऊर्फ पन्हाळेकाजी हा छोटेखानी किल्ला त्यांपैकीच एक ...

पन्हाळेकाजी लेणी समूह : विविध तरी एकात्म ! (Panhalekaji cave sculpture – varied styles...

दापोलीजवळचा पन्हाळेकाजी लेणी समूह म्हणजे भारतातील स्थापत्यकलेत व धार्मिक पंरपरेत बदल कसे होत गेले त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे हीनयान, वज्रयान, शैव, गाणपत्य, नाथ अशा विविध धर्मसंप्रदायांचा वेगवेगळ्या काळातील प्रभाव दिसून येतो. लेणी मोठ्या कालखंडात खोदली गेली, तथापी त्याची शिल्पशैली त्यानुसार विविध तरी एकात्म दिसून येते...

दाभोळ आणि परकीय प्रवासी

‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात...

दाभोळचा इतिहास – मक्केचा दरवाजा !

दाभोळ हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ते महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. कोकणातील बंदरे सातवाहन काळात भरभराटीस आली. तेथून रोम, इजिप्त, अरेबिया, इराण या देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा तेराव्या शतकापर्यंतचा इतिहास चालुक्य, शिलाहार, यादव यांसारख्या हिंदू राजवटींचा इतिहास आहे...