Home Authors Posts by नीला पटवर्धन

नीला पटवर्धन

6 POSTS 0 COMMENTS
नीला श्रीपाद पटवर्धन यांचे शिक्षण एम ए, बी एड् झाले आहे. त्या डॉ.पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या सचिव, विश्वस्त 1981 सालापासून तर कार्यकारी विश्वस्त म्हणून 2003 पासून कार्यरत आहेत. त्या ट्रेनिंग फॉर चेंज या प्रशिक्षण कार्यक्रमात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे 2000 साली सहभागी झाल्या होत्या. त्यांचा ग्रामीण महिलांसोबतचा पत्र संवाद हा ‘प्रिय सखी’ या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाला आहे. त्यांना ‘यमुनाबाई खेर’ पुरस्कार (2007) आणि ‘साने गुरुजी स्मृति पुरस्कार’ (2015) यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्या मुंबईत मालाड येथे राहतात.

मंडलीक ट्रस्ट – पंचायत राज प्रबोधनाचे कार्य (Mandalik Trust For Decentralised Democracy)

डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टची स्थापना 31 मार्च 1971 रोजी झाली. ट्रस्टचा सुवर्ण महोत्सवदेखील होऊन गेला. मात्र कोरोनामुळे त्या दोन वर्षांत ट्रस्टच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामास अनेक मर्यादा आल्या. परंतु ट्रस्टने गेल्या पाच दशकांत समाजजागृतीचे विशेषत: पंचायत राज संकल्पना जनमानसात मुरवण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. पी.व्ही. मंडलीक यांनी स्वत:च तो ट्रस्ट सामाजिक ऋणाच्या जाणिवेतून निर्माण केला...

शैला मंडलीक- दापोलीचे आधुनिक महिला नेतृत्व (Shaila Mandalik- Women Reformist from Dapoli)

दापोलीच्या शैला(ताई) मंडलीक यांची जन्मशताब्दी 8 जानेवारी 2023 ला होऊन गेली. त्यांनी लोकसेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्या डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. संपर्कात येणाऱ्या माणसाची अडचण सोडवण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने प्रयत्न करणारी माणसे समाजात थोडी असतात. शैला तशांपैकी एक होत्या. बालपणी आईचे संस्कार, विवाहानंतर डॉ.आप्पा मंडलीक यांची साथ आणि थोरले दीर समाजवादी नेते डॉ. पी.व्ही. मंडलीक यांचे मार्गदर्शन... त्यामुळे शैला समाजकार्य खंबीर मनाने करू शकल्या...

जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor with heart)

डॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते...

पी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श (P V Mandalik- Doctor with socialistic ideals)

वासुतात्या मंडलीक यांच्या दोन मुलांनी नाव काढले- पैकी डॉ. पुरुषोत्तम वासुदेव (पी.व्ही.) मंडलीक यांनी मुंबईत प्रॅक्टिस केली आणि मोठे सार्वजनिक काम उभे केले. पी.व्ही. यांनी 1924 पासून खेतवाडी परिसरात आठव्या गल्लीच्या नाक्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. ते 1957 सालच्या विधानसभा निवडणुकीत, दापोली-मंडणगड मतदार संघातून प्रजासमाजवादी पक्षातर्फे व 1962 साली दापोली-गुहागरमधून उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ते समाजवादी विचाराच्या अनेक संस्थांशी जोडलेले होते...

दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे (Dapoli’s four hundred years old Mandalik family)

दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. गंगाधरभट यांनी मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची दृष्टी लक्षात येते. मंडलीक घराण्यातील रावसाहेब, डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही. यांचे योगदान महत्त्वाचे आहे...

आठवणीत जपलेली माझी दापोली

माझ्या आठवणीत रेंगाळलेली दापोली मला रोज आठवते. ती दापोली आहे पन्नास-साठच्या दशकातील. माझे एस एस सी होईपर्यंतचे सारे आयुष्य दापोलीत गेले. मी एस एस सी नंतर दापोलीत कॉलेजची सोय नसल्यामुळे मुंबईत आले.तिकडे दापोलीची हद्द सुरू झाली, की काळकाईच्या कोंडावरची असंख्य थडगी दिसू लागत. त्याचप्रमाणे, आजुबाजूच्या शेतांचे दगडी बांध दिसत. काळकाईचा उतार संपला की डाव्या हाताला मशीद आणि मशिदीच्या खालच्या अंगाला खळखळ वाहणारा ओढा होता. थोडे पुढे आले, की दापोलीचे प्रसिद्ध आझाद मैदान दिसे...