Home Tags मोगरा फुलला

Tag: मोगरा फुलला

नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल...

कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...

विज्ञानबोधाची प्रस्तावना – श्री.म.माटे (Vidnyanbodhachi Prastavana)

श्री.म.माटे उर्फ माटे मास्तर हे महाराष्ट्रातल्या कर्त्या सुधारकांपैकी एक. त्यांनी दलित साहित्याची पहाट होण्यापूर्वी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहून दलितांची स्थितीगती मराठी समाजासमोर आणली. त्यातले, ‘बन्सीधरा! तू कोठे जाशील?’ ‘कृष्णाकाठचा रामवंशी’ किंवा ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्या कथा आजही अनेकांच्या लक्षात असतील. ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ हे कुठल्या पुस्तकाची प्रस्तावना नसून स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांचा ‘विज्ञानबोध’ नावाचे वार्षिक नियमितपणे प्रकाशित करण्याचा मानस होता. याची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टीकोनाची मांडणी केली आहे. गिरीश दुर्वे यांच्या लेखाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी जिज्ञासा जागृत व्हावी हाच हेतू आहे...

गणितीय कूट रचनेचे मर्म (Concept of Mathematical Coherence)

1
शास्त्रीय संगीताविषयी आणि गणिताविषयी मालिका सुरू करण्याचे उद्दिष्ट हे आहे की काही अमूर्त सौंदर्य कल्पनांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर व्हावा. सर्वसामान्यपणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच गणिताविषयी मनात एक सूक्ष्म अढी असते पण दोन्ही समजल्यावर आंनंद होतो. गणिताविषयीच्या मालिकेत काही संकल्पना आणि काही कोडी अशी जाणीवपूर्वक रचना केली आहे जेणेकरून वाचायलाही गंमत येईल...

मधुमालतीचे दिवस (Madhumalati Days)

‘मधुमालती’ हे काव्य चतुर्भुजदास या कवीचे, अवधी भाषेत लिहिलेले मध्ययुगातले काव्य. कलेतिहासाच्या अभ्यासक डॉ. मंजिरी ठाकूर यांच्या हाती या काव्याचे हस्तलिखित लागले ज्यात दोनशेहून अधिक राजस्थानी शैलीतील लघुचित्रे होती. या काव्याचा आणि चित्रांचा अभ्यास करताना एकातून एक उलगडत जाणाऱ्या कथा, उपकथा, जोडकथांचे एक मनोहर जोडकाम असणाऱ्या खास भारतीय कथनशैलीपर्यंत आणि त्यायोगे पंचतंत्रापर्यंत त्या येऊन पोचल्या. ‘मधुमालती’ या काव्याविषयी, भारतीय कथनशैलीविषयी आणि पंचतंत्राच्या जगद्व्यापी प्रवासाविषयी आजच्या लेखात खास शैलीत लिहित आहेत डॉ. मंजिरी ठाकूर...

अग्रोली गाव आणि बेलापूर (Agroli Village and Belapur, Navi Mumbai)

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर त्यात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या एकोणतीस गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. पण या सगळ्या गावांना मनोरंजक इतिहास आहे. तेथे झालेल्या आंदोलनांचा, सामाजिक चळवळींचा, मंदिरांचा आणि गडकिल्ल्यांचा वारसा आहे. यातल्या आग्रोली आणि बेलापूर या वैशिष्ट्यपूर्ण गावांविषयी लिहित आहेत शुभांगी पाटील-गुरव...

मंगल मैत्री : एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाच्या जन्माची गोष्ट

1
विख्यात गणितज्ज्ञ डॉ. मंगल जयंत नारळीकर यांचे 17 जुलै 2023 रोजी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या माहितीची नोंद व्हावी या उद्देशाने डॉ. शुभा थत्ते यांच्यासह डॉ. मंगला नारळीकर यांच्या सहा मैत्रिणींनी त्यांच्या आठवणींचे एक पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. ‘मंगलमैत्री’ नावाचे हे पुस्तक डॉ. शुभा थत्ते यांनी संपादित केले आहे. त्या या लेखात पुस्तकाच्या जन्माविषयी सांगत आहेत. जेणेकरून वाचकांना डॉ. मंगला नारळीकर यांचा परिचय होईल आणि पुस्तक वाचावेसे वाटेल...

स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears...

ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...

मैफल रागसंगीताची !(Classical Music Consort)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची लेखमाला सुरू करण्याचा उद्देश श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातल्या काही संकल्पना सांगाव्या, शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला साहाय्य करता आले तर करावे हा आहे. या लेखात ते सांगत आहेत, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची मांडणी कशी असते, मैफिलीत गायल्या जाणाऱ्या रचनांचे स्वरूप कसे असते याविषयी. काही संज्ञा, शब्द; जे वारंवार शास्त्रीय संगीताच्या संदर्भात कानावरून जातात त्या संज्ञांचे, शब्दांचे अर्थही त्यांनी उलगडून सांगितले आहेत. या माहितीचा उपयोग मैफिलीचा आनंद घेताना होईल...

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious...

म्युझियम्स म्हणजेच वस्तुसंग्रहालये ही अनौपचारिक शिक्षणाची साधने असतात. समाजाच्या कर्तृत्वाची ओळख असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवण्याचे साधनही असतात. कलेतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शर्मिला फडके क्रमश: मुंबईतील म्युझियम्सची आणि कलादालनांची ओळख करून देणार आहेत. त्यापैकी एक डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. हे मुंबई शहरातील पहिले म्युझियम. ते काही काळ विस्मरणात जाऊन आता पुन्हा नव्या झळाळीने उभे राहिले आहे...