Home Authors Posts by नीरजा

नीरजा

1 POSTS 0 COMMENTS
नीरजा या मराठीतल्या आघाडीच्या कवयित्री, कथाकार व कादंबरीकार आहेत. त्यांचे 'वेणा', 'निरन्वय' असे सहा कवितासंग्रह, चार कथासंग्रह, चार ललित लेखांचे संग्रह व 'थिजलेल्या काळाचे अवशेष' ही कादंबरी प्रकाशित आहे. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारासह विविध नामवंत संस्थांचे अठ्ठावीस पुरस्कार लाभले आहेत. त्यांची पुस्तके महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लावलेली आहेत.

कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...