Home Authors Posts by भूषण गोपाळ देशमुख

भूषण गोपाळ देशमुख

2 POSTS 0 COMMENTS
भूषण देशमुख हे पत्रकार आहेत. ते इतिहास आणि पर्यटन या विषयांवर प्रामुख्याने लेखन करतात. त्यांची नगर दर्शन, नगर प्रदक्षिणा, नगर परिक्रमा आणि डिस्कव्हर अहमदनगर ही पुस्तके प्रकाशित आहेत. ते हेरिटेज वाॅक उपक्रमाचे आयोजन करतात. लेखकाचा दूरध्वनी 9881337775

अहमदनगरचा भुईकोट (Ahmednagar Fort)

किल्ल्यांचे तीन मुख्य प्रकार गिरीदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग असे असतात. भुईदुर्ग म्हणजे अर्थातच जमिनीवरचा किल्ला किंवा भुईकोट. महाराष्ट्रात भुईदुर्गांचे प्रमाण कमी आहे. अशा भुईदुर्गांपैकी अहमदनगरचा भुईकोट हा गेल्या पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ अस्तित्वात आहे. इतकेच नाही तर वेगळ्या कारणांसाठी वापरात आहे. त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो किल्ला मुघल, पेशवाई आणि ब्रिटिश काळात तुरुंग म्हणून वापरात होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांच्यासारखे ‘हाय प्रोफाईल्ड’ राजकीय कैदी त्या तुरुंगात बंदी होते. त्याच तुरुंगात नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारखा महत्त्वाचा बृहद्ग्रंथ लिहिला...
-heading

महाराष्ट्राचे व्हेनिस… नगर, सोळाव्या शतकातील

अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि,...