Home Authors Posts by मंजिरी ठाकूर

मंजिरी ठाकूर

2 POSTS 0 COMMENTS
डॉ. मंजिरी ठाकूर यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून एम ए आणि पी एचडी केले आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि कान्हेरी येथील लेण्यांमधील शिल्पकला हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. त्यांना ऑक्सफर्ड सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज, ऑक्सफर्ड, युकेची पोस्ट डॉक्टरल फेलोशिप तसेच हेरास इन्टिट्यूटची सर दोराब टाटा फेलोशिप मिळाली आहे. त्यांनी महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या टुरिझम डिपार्टमेंटसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या डेप्युटी क्युरेटर होत्या. त्यांनी कलेतिहासाशी संबंधित विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांचे शोधनिबंध प्रकाशित आहेत. त्या जे.जे स्कूल ऑफ आर्टच्या कलेतिहासाच्या संलग्न प्रध्यापक म्हणून कर्यरत आहेत.

भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)

पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...

मधुमालतीचे दिवस (Madhumalati Days)

‘मधुमालती’ हे काव्य चतुर्भुजदास या कवीचे, अवधी भाषेत लिहिलेले मध्ययुगातले काव्य. कलेतिहासाच्या अभ्यासक डॉ. मंजिरी ठाकूर यांच्या हाती या काव्याचे हस्तलिखित लागले ज्यात दोनशेहून अधिक राजस्थानी शैलीतील लघुचित्रे होती. या काव्याचा आणि चित्रांचा अभ्यास करताना एकातून एक उलगडत जाणाऱ्या कथा, उपकथा, जोडकथांचे एक मनोहर जोडकाम असणाऱ्या खास भारतीय कथनशैलीपर्यंत आणि त्यायोगे पंचतंत्रापर्यंत त्या येऊन पोचल्या. ‘मधुमालती’ या काव्याविषयी, भारतीय कथनशैलीविषयी आणि पंचतंत्राच्या जगद्व्यापी प्रवासाविषयी आजच्या लेखात खास शैलीत लिहित आहेत डॉ. मंजिरी ठाकूर...