Home Search
“ - search results
If you're not happy with the results, please do another search
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)
म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
वि.स. खांडेकर- एक विसावा (Remembering V.S. Khandekar)
मराठीला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे, मागच्या शतकातले विख्यात लेखक वि.स. खांडेकर यांची 11 जानेवारी 2024 रोजी एकशेपंचविसावी जयंती आहे. कथा, पटकथा, कादंबऱ्या, नाटके, ललितलेख, निबंध, समीक्षा अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये खाडेकरांच्या नावावर पंचाहत्तरपेक्षा जास्त लेखनकृती आहेत. आजही त्यांच्या ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाती’, ‘क्रौंचवध’ या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत. त्यांच्या एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे लेखनिक राहिलेले राम देशपांडे त्यांच्या आठवणी सांगत आहेत...
टीच – माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक (TEACH Tool for School Inspection)
वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे. या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे...
मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...
झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...
क्रांतियुद्ध 1857 च्या आधीचे उठाव (Uprisings against British prior to struggle for independence of...
स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरूद्ध उठाव 1857 च्या क्रांतियुद्धाअगोदरही झालेले होते. दक्षिणेतील वेलोर छावणीतील हिंदी शिपायांना कपाळावर गंध लावण्यास, कानात भिकबाळ्या घालण्यास किंवा दाढी राखण्यास बंदी 1806 साली घातली होती. त्यामुळे हिंदू-मुसलमानांनी त्यांच्या भावना –धर्मभावना दुखावल्या गेल्या म्हणून उठाव केलेला होता. कंपनी सरकारने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत करून त्यांचे राज्य 1839 साली खालसा केले...
मंगेश मुंबईकर घोगरे (Mangesh Mumbaikar Ghogre)
जगभरच्या देशांतून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा जारी केले जातात. त्यात EB-1A नावाची एक श्रेणी असते. त्याला ‘आइनस्टाईन व्हिसा’ म्हणतात. तो व्हिसा असामान्य क्षमता, कौशल्य असणाऱ्या गैर-अमेरिकनांना कायमस्वरूपी निवासासाठी दिला जातो. आइनस्टाईन व्हिसा मिळालेल्या मंगेश घोगरे यांच्याविषयी जाणून घेऊया...
गंधगान (Whispers on the Wind !)
‘मोगरा फुलला’ हे सदर सुरू करून दोन महिने झाले आहेत. दालन सुरू करताना संवेदना उजागर करणे आणि जाणीवसमृद्धी असे दोन उद्देश समोर ठेवले होते. पंचेंद्रियांना जे जाणवते ते शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आजचा डॉ. मंजुषा देशपांडे यांचा ‘गंधगान’ हा लेख पंचेंद्रियांना जे जाणवते त्यापलिकडे जाऊन अबोध नेणिवेत रुतून बसलेल्या जाणिवांविषयी सांगत आहे. एक ज्ञानेंद्रिय विकल असेल तर इतर ज्ञानेंद्रिये अधिक सजग होतात आणि विकल ज्ञानेंद्रियामुळे आलेले न्यून दूर करण्याचा प्रयत्न करतात...
ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने… (Movie Animal – A Turning Point ?)
ॲनिमल या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का...
चांगुलपणा अवतीभवती
श्रीकांत पेटकर यांनी “चांगुलपणा अवतीभवती” हे छोटेखानी पुस्तक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील काही निवडक लेखांचा संग्रह या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पुस्तक ‘ग्रंथाली’ या मान्यवर संस्थेच्या देखरेखीखाली प्रकाशित झाले आहे, तर ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभलेली आहे. सामाजिक, कला आणि संस्कृती क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेले परंतु प्रसिद्धीविन्मुख अशा व्यक्तींबाबत लेख या पुस्तकात आढळतात...
वृत्तबद्ध कविता- स्थिती आणि गती (Poetry Writing in Metre – Present Scenario)
मराठी कवितेच्या सर्वसाधारण वाचकाची अशी समजूत असते की वृत्तबद्ध कविता ही काहीतरी भूतकाळातली गोष्ट आहे. कवितेला वृत्तामध्ये बांधण्यामुळे आशयाला धक्का लागतो किंवा अभिव्यक्तीवर बंधने येतात. वृत्ताविषयी अशीही समजूत असते की व्याकरणाच्या पुस्तकात असतात तेवढीच वृत्ते अस्तित्वात आहेत. प्रत्यक्षात अनेक कवी आजही वृत्तबद्ध कविता लिहितात आणि तीही समर्थपणे लिहितात. नवीन वृत्ते जन्माला येत आहेत. तरुण कवी वृत्तांमध्ये कविता लिहित आहेत...