Home Authors Posts by शर्मिला फडके

शर्मिला फडके

2 POSTS 0 COMMENTS
शर्मिला फडके या लेखक, कला-इतिहास अभ्यासक आहेत. वनस्पतीशास्त्रातील पदवी शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारिता, जाहिरात कला, प्राचीन आणि समकालीन भारतीय तसेच पाश्चात्य कलेचा इतिहास, आधुनिक भारतीय कला-संस्कृती या विषयांमधे विशेष शिक्षण घेतले आहे. कला संशोधन-लेखन-दस्तावेजीकरण यामधे त्यांना विशेष रस आहे. विविध विषयांवर गेली पंधराहून अधिक वर्षे दैनिके, मासिके, दिवाळी अंकांमधे, तसेच ’चिन्ह’ या कला-वार्षिकामधे त्या सातत्याने लेखन करत आहेत. चित्रकार राजा रविवर्मा यांच्या चित्रनायिका आणि व्यावसायिक कलाजीवन या विषयावरील त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध आहे. त्यांची ‘फोर सीझन्स’ ही पर्यावरण आणि मानवी नातेसंबंधांचा वेध घेणारी कादंबरी प्रकाशित झाली आहे. समकालिन तुर्की साहित्यातली पुस्तक मालिका, तसेच इतरही निवडक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. त्या म्युझियम आणि पर्सनल मेमरीज विषयाशी संबंधित शोधप्रकल्पावर काम करत आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (Dr. Bhau Daji Lad Museum- Glorious...

म्युझियम्स म्हणजेच वस्तुसंग्रहालये ही अनौपचारिक शिक्षणाची साधने असतात. समाजाच्या कर्तृत्वाची ओळख असतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा सोपवण्याचे साधनही असतात. कलेतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शर्मिला फडके क्रमश: मुंबईतील म्युझियम्सची आणि कलादालनांची ओळख करून देणार आहेत. त्यापैकी एक डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम. हे मुंबई शहरातील पहिले म्युझियम. ते काही काळ विस्मरणात जाऊन आता पुन्हा नव्या झळाळीने उभे राहिले आहे...

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)

म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...