नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ

0
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. तेथे केदारेश्वरचे जुने मंदिर आहे. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते...

अहमदनगरचा ऐतिहासिक फराहबक्ष महाल

मलिक अहमदने भिंगारजवळ एक किल्ला आणि शहर वसवावे असे ठरवले. त्याप्रमाणे शहर आणि शहरातील वास्तू उभारण्यास 28 मे 1490 या दिवशी सुरुवात केली. अहमदनगर शहरातील तशा वास्तूंपैकी एक आहे फराहबक्ष महाल. त्याला नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखतात. ती नगरमधील सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष आहे...

अप्रसिद्ध रामगड (रामदुर्ग)

‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...

एक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग !

सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्याच्या हर्णे बंदर गावात सागराच्या दिशेने उभा आहे. तो भव्यदिव्य आहे. त्यामुळे तो पर्यटकांना पहिली साद घालतो. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तो किल्ला म्हणजे कोकणच्या सौंदर्यात पडलेली जडजवाहिराची खाणच जणू ! त्याने आठ एकर जागा व्यापली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट आहे. किल्ला सागर किनाऱ्याचे रक्षण करत ताठ मानेने उभा आहे...

दापोलीचे सुजाण मंडलीक घराणे (Dapoli’s four hundred years old Mandalik family)

दापोलीच्या मंडलीक घराण्याच्या इतिहासात पंधराव्या शतकापर्यंत मागे जाता येते. गंगाधरभट यांनी मुरुड हे गाव वसवले. मंडलीक घराण्याचा ठळक गुणविशेष म्हणून विस्थापितांचे पुनर्वसन, नवीन प्रदेशात वस्ती करून नवे विचार रूजवणे असा सांगता येईल. त्यांनी मुरुड गाव वसवताना मुसलमान बंधूंसाठी मशीद बांधली ! त्यावरून त्यांची सर्वधर्मसमभावाची दृष्टी लक्षात येते. मंडलीक घराण्यातील रावसाहेब, डॉ. पी.व्ही. व डॉ. जी.व्ही. यांचे योगदान महत्त्वाचे आहे...

निंबाळकर घराणे : सत्तावीस पिढ्यांची कारकीर्द (Dynasty of the Nimbalkars)

फलटण हे फक्त चौऱ्याऐंशी गावांचे संस्थान. आकाराने आटोपशीर; परंतु त्याचा मान आणि दबदबा मोठा होता. फलटणमध्ये नाईक-निंबाळकर घराण्याची सत्ता सातशे वर्षे निरंकुशपणे होती. त्या राजघराण्याने एकूण सत्तावीस पिढ्यांच्या राज्यकर्त्यांची वैभवशाली कारकीर्द घडवली. प्रजाप्रिय घराणे म्हणून त्यांची ओळख होती. नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते...

दर्गा – दुला रहिमानशहा

‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...

कोकणी घराचा नमुना देगावला (Typical layout of a Konkan house at Degaon)

0
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले...

आठवणीत जपलेली माझी दापोली

माझ्या आठवणीत रेंगाळलेली दापोली मला रोज आठवते. ती दापोली आहे पन्नास-साठच्या दशकातील. माझे एस एस सी होईपर्यंतचे सारे आयुष्य दापोलीत गेले. मी एस एस सी नंतर दापोलीत कॉलेजची सोय नसल्यामुळे मुंबईत आले.तिकडे दापोलीची हद्द सुरू झाली, की काळकाईच्या कोंडावरची असंख्य थडगी दिसू लागत. त्याचप्रमाणे, आजुबाजूच्या शेतांचे दगडी बांध दिसत. काळकाईचा उतार संपला की डाव्या हाताला मशीद आणि मशिदीच्या खालच्या अंगाला खळखळ वाहणारा ओढा होता. थोडे पुढे आले, की दापोलीचे प्रसिद्ध आझाद मैदान दिसे...

दापोलीतील पाखरपहाट

मी दापोलीत 1996 मध्ये स्थिरावलो. मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो...