Home Authors Posts by मानसी चिटणीस

मानसी चिटणीस

3 POSTS 0 COMMENTS
मानसी चिटणीस या कवयित्री आहेत. त्या विविध साहित्यिक संस्थांत कार्यरत आहेत. त्यांचे सृजनभान, सांजवर्खी शकुन, माझ्यातील बुद्धाचा शोध हे तीन कवितासंग्रह आणि उत्सव हा कथासंग्रह प्रकाशित आहे. त्यांचे लेखन विविध मासिके आणि आघाडीची वृत्तपत्रे येथे प्रसिद्ध होत असते. त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार लाभले आहेत. त्या ‘कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच ‘ही कविता आली तुम्हास भेटायला’ या समूह कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.

दक्षिण सोलापुरातील शिवक्षेत्रे- सोमेश्वर, संगमेश्वर, रामलिंगेश्वर, शंभू महादेव, नागनाथ

शिवक्षेत्रे दक्षिण भारतात, खास करून महाराष्ट्रात अधिक पाहण्यास मिळतात. धारणा अशी आहे, की जेथे जेथे शिवलिंगांची स्थापना झालेली आहे ती सर्व क्षेत्रे संवेदनशील भूभागावर वसलेली आहेत. म्हणजे ज्वालामुखीची तोंडे किंवा भूकंपप्रवण क्षेत्रे. शिवमंदिरातील शांत गंभीरता भक्तांना शिवाच्या चरणी लीन होण्यास भाग पाडण्याइतकी प्रभावी असते. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील एक हजार वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक वारसा जपून शिल्लक राहिलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे तेथील आगळीवेगळी शिवतीर्थे...

कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !

मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...

सामानगड – वेडात दौडले वीर मराठे सात ! (Samangad – The fort known for...

कोल्हापूरजवळच्या सामानगड या किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व, दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो वल्लभगड, महिपालगड, भुदरगड, रांगणा अशा लढाऊ किल्ल्यांच्या बेचक्यात, अगदी मधोमध आहे. त्यामुळे त्या किल्ल्याचे महत्त्व रसद पुरवठ्यासाठी फार जाणवून गेले. त्यावरूनच कदाचित किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे ! अवघा महाराष्ट्र शिवराज्याभिषेकात 1674 मध्ये न्हाऊन निघाला होता. तेव्हा त्या किल्ल्याच्या परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांना मात्र त्या शिवराज्याभिषेक समारंभापासून वंचित राहवे लागले...