Home Authors Posts by सविता दामले

सविता दामले

2 POSTS 0 COMMENTS
सविता दामले या मराठी अनुवादिका, लेखिका आणि कवयित्री असून त्यांनी पत्रकारितेची पदविका घेतली आहे. त्यांनी मराठीतील नामवंत प्रकाशकांसाठी पन्नासहून अधिक इंग्रजी पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यांनी केलेल्या अनुवादांत ‘जेरुसलेम एक चरित्रकथा’, महात्मा गांधी सचित्र चरित्र दर्शन, नेहरूंची सावली, ‘गुलजार यांच्या पटकथा’, मेलिंडा गेट्स यांचे आत्मकथन, मोसाद या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांनी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ‘माझे गाणे, माझे जगणे’ या आत्मचरित्राचे शब्दांकन केले असून रतन टाटा आणि शर्मिला इरोम यांची चरित्रे लिहिली आहेत आणि दोन कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे लेख अनेक मासिकांत आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल आहेत. त्यांनी सकाळ वृत्तपत्रात ‘नोकरीचाकरी’ हे सदरलेखन केले होते. त्यांना मराठी अनुवाद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबईच्या 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'तर्फे 2020 सालचा पुरस्कार आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था यांच्याकडून 2023 सालचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लिहिलेली गीते वैशाली सामंत, साधना सरगम अशा गायिकांनी गायली आहेत.

निढळाच्या घामाची नगरी – धारावी (A City of Hard Working People)

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे बिरुद (!) मिरवणारी धारावी ही झोपडपट्टी. सुरुवातीला ती मुंबई शहराच्या शीवेच्या म्हणजे सायनच्या बाहेर होती. पाण्याने एखाद्या बेटाला विळखा घालून पुढे जावे, तसे मुंबई शहर धारावीला विळखा घालून पुढे सरकत गेले. धारावी आता वाढत्या शहराच्या मध्यावर आली आहे. तो कष्टकऱ्यांचा मिनीभारतच आहे ! भारतभरच्या सगळ्या प्रांतांमधील विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक तेथे वस्ती करून आहेत. घेट्टो करून रहाणं ही माणसांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे एकच व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रांतनिहाय वस्त्या धारावीत आहेत. धारावीने मुंबईच्या मध्यभागी जवळपास सहाशे एकर जमीन व्यापली आहे. सध्याच्या काळात जमिनीला आलेले मोल कोणाला सांगायला नको...

माझी मुंबई (My Mumbai)

1
मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे...