Home Authors Posts by अनघा फडणीस

अनघा फडणीस

2 POSTS 0 COMMENTS
अनघा फडणीस या मूळ साताऱ्याच्या. त्यांचे शिक्षण बी कॉम आणि डिप्लोमा इन अँग्रिकल्चर असे झाले. त्यांचे पती अशोक फडणीस हे नाना फडणीस यांच्या पाचव्या पिढीतील वंशज आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही सीए आहेत. अनघा यांना शेतीची आवड असल्यामुळे त्या शेतीत कार्यरत असतात. त्यांनी स्वतः सेंद्रिय खत प्रकल्प उभारला आहे तसेच त्या पुणे येथे नर्सरी व गार्डनिंग शेतीसंबंधी मार्गदर्शनही करतात.

श्रीमंत नाना फडणीस यांचा वाडा (Nana Phadnis’s famous Menavali-Wai palace)

1
नाना फडणीस यांनी बांधलेला मेणवलीचा वाडा ही वाई येथील ऐतिहासिक महत्त्वाची गोष्ट. तो उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. नानांचे वंशज तेथे राहत आहेत. त्यांनी नानांच्या मेणवली व बेलबाग या दोन्ही वास्तू उत्तम प्रकारे जतन केल्या आहेत. तो शांत परिसर नानांच्या एकांतप्रिय मनाला भावला असणार; म्हणून नानांनी तेथे वास्तव्यासाठी सुंदर वास्तूंची व अतिसुंदर अशा घाटाची निर्मिती केली...

नाना फडणीस : स्वराज्याचा शेवटचा वीर (Nana Phadnis’s contribution to Peshawa Raj)

0
नाना फडणीस यांनी त्यांच्या असामान्य बुद्धिचार्तुयाने, कर्तृत्वाने आणि अपार कष्टांनी स्वराज्याचे रक्षण करण्याचे, ते टिकवण्याचे आणि वाढवण्याचेही कार्य मराठ्यांच्या इतिहासात केले आहे. त्यांची ख्याती निष्ठावंत प्रशासक आणि कर्तबगार स्वराज्यसेवक अशी आहे...