Home Authors Posts by संदीप चव्हाण

संदीप चव्हाण

4 POSTS 0 COMMENTS
संदीप चव्हाण यांनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’तून ‘आरोग्यसेवांचे व्यवस्थापन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी देशात विविध राज्यांतील दुर्गम भागात संस्थात्मक पातळीवर प्राथमिक आरोग्य सेवा, माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य ह्या क्षेत्रात कार्य केले आहे. ते ‘सहजकर्ता प्रतिष्ठान’ त्यांच्या गावी- वाणेवाडी (तालुका बारामती) येथे चालवतात. प्रतिष्ठान तर्फे मानसिक आरोग्य संवर्धनाचे कार्य चालते- अभ्यासिका आहे. संदीप यांना इतिहास निरीक्षण, दुर्ग भ्रमंती, सायकल भटकंती, खाद्य व लोकसंस्कृतीचा अभ्यास असे छंद आहेत. त्यांचे वास्तव्य पुण्याला असते.

मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा

महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...

साताऱ्याचा नांदगिरी किल्ला आणि दुर्मीळ जैन मंदिर

साताऱ्यातील कल्याणगड तथा नांदगिरी हा किल्ला अपरिचित आणि दुर्गम असा आहे. तो सह्याद्रीमधील महादेव रांगेच्या एका शृंगामध्ये उभा आहे. किल्ला सातारा शहर आणि पुणे-सातारा महामार्ग यांच्या पूर्वेला येतो. किल्ल्याच्या जवळ जरंडेश्वराचा डोंगर आहे. तेथे रामदास स्वामींनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर आहे. यमाई मातेचे मंदिरही जवळ, किन्हई डोंगरावर आहे. बालेकिल्ल्यावर सपाट भागात मधोमध वडाचे मोठे झाड आहे. त्यामुळे किल्ला दुरूनही ओळखता येतो...

संभाजीराजांचा मृत्यू गुढीपाडव्यास झाला? (Did Aurangjeb Kill Sambhaji Maharaj On Auspicious GudhiPadwa Day)

संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीतील संकेतांनुसार 11 मार्च 1689 या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, मुख्यतः विरोधक ब्राह्मणांनी आनंदाच्या भरात गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधुनमधून फिरतात.

कबिरानुभूती (Living With Saint Kabir)

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि कायदा ह्यामुळे देशातील वातावरण तापले होते. कोरोनामुळे तो मुद्दा थोडा बाजूला पडला आहे. मुस्लिम बांधवांचा सूर नागरिकत्व कायद्याबद्दल नकारात्मक जाणवतो. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना रुजली आहे का? तशातच काही मुस्लिम तसेच हिंदुत्ववादी