Home व्यक्ती

व्यक्ती

महाराष्‍ट्रातल्‍या गावखेड्यांपासून आंतरराष्‍ट्रीय स्‍तरापर्यंत पसरलेले मराठी उद्योजक, खेळाडू, कलाकार, विचारवंत, अभ्‍यासक, संशोधक अशा अनेक कर्तृत्‍ववान व्‍यक्‍तींची माहिती येथे प्रसिद्ध केली जाते.

दाभोळचे बिनखुर्चीचे डॉक्टर मधुकर लुकतुके (Dabhol’s Doctor Madhukar Luktuke)

डॉ. मधुकर लुकतुके यांचा दाभोळचा दवाखाना गेल्या सहा दशकांपासून चालू आहे. दाभोळ पंचक्रोशीतील रहिवासी वैद्यकीय उपचार आणि सल्ला यांसाठी त्यांच्याकडे एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे सहकुटुंब गर्दी करतात. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना बहुदा तेथे जन्माला आली असावी ! डॉक्टर हे माझे आजोबा. आम्ही त्यांना ‘जोजो’ म्हणतो. जोजोंनी मेडिकल ऑफिसर म्हणून ‘पोस्टिंग’ मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतले. असे ते 1960 साली दाभोळला पोचले आणि तेथीलच झाले...

नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s...

1
कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?

अनंत काणेकर – अस्सल मराठी बाणा

0
अनंत काणेकर नेहमी म्हणत, ‘माणसाने नुसते जगू नये, जगण्याला काही अर्थ आहे का हे सतत शोधत राहवे’. काणेकर स्वत: त्यांचे पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य अर्थपूर्ण, आनंदी वृत्तीने जगले आणि त्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना प्रसन्न वृत्तीने कसे जगावे हे शिकवले. त्यांचे मूळ गाव मालवणचे मेढे. त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम मुंबईच्या खालसा कॉलेजात पाच वर्षे आणि सिद्धार्थ महाविद्यालयात चोवीस वर्षे केले...

थॅलेसेमियासाठी साथ ट्रस्ट (Saath Trust For Thalassemia)

1
सुजाता चेतन रायकर या ‘थॅलेसिमिया’ या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करतात आणि तो आजार झालेल्या निवडक मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सर्वतोपरी ‘साथ’ देण्याचे काम करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, थॅलेसिमियाविषयी जनजागृती करणे हाच प्रतिबंधात्मक उपाय त्या आजारावर आहे. कारण त्या रोगप्रसाराचा लग्न या विषयाशी घनिष्ट संबंध आहे. त्याकरता सुजाता शाळा-महाविद्यालयांत जाऊन मुलांशी गेली दहा वर्षें संवाद साधतात. त्यांना रक्ततपासणीस व रक्तदानासही प्रवृत्त करतात...

रावबहाद्दुर कै. सदाशिवभाऊ साठे (Raobahaddur Sadashiv Sathe who made kalyan a modern city)

0
सदाशिवभाऊ साठे हे स्वकर्तृत्वावर रावबहादूर झाले होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी आणि करून घेतलेले वाड्याचे बांधकाम; तसेच, अन्य लग्नकार्य व समारंभ या संबंधात लिहिलेले हिशोब यावरून त्या काळातील जनजीवन आणि महागाई-स्वस्ताई याची नेमकी माहिती मिळते. त्या पार्श्वभूमीवर सदाशिवभाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तृत्व सहजपणे उठून दिसते...

महादेवशास्त्री जोशी – संस्कारशील कथा

0
महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोव्याच्या सत्तरी परगण्यामधील आंबेडे या गावी झाला. त्यांचे कथेच्या माध्यमातून मनुष्याच्या मनावर सद्भावनांचे संस्कार करणे हे उद्दिष्ट वाटे. त्यांचे जीवनविषयासंबंधीचे विचार, त्यांचे साहित्यिक कर्तृत्व व त्यांची आचरणशीलता यांमध्ये एकवाक्यता आढळते...

दापोलीचे लोकनेते : बाबुराव बेलोसे (Baburao Belose – The man who shaped Dapoli’s tourism...

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया ज्यांनी रचला, अशा महनीय व्यक्तींमध्ये रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते लोकनेते म्हणूनच गणले जातात- लोकांमध्ये मिसळून गेलेला असा पुढारी विरळाच. कोकणच्या समस्या बाबुरावांनी धाडसाने व तडफदारपणे विधानसभेत मांडल्या – त्यांचा पाठपुरावा केला. म्हणून त्यांना त्यांचे सहकारी ‘कोकणची सिंहगर्जना’, ‘कोकणची धडाडणारी तोफ’ असे म्हणत असत...

त्यागमूर्ती – रमाई आंबेडकर

रमाई आंबेडकर या बाबासाहेबांच्या पत्नी. त्यांचा जन्म दापोली तालुक्यात वणंदगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे 7 फेब्रुवारी 1898 ला झाला. रमाई यांची साथ होती म्हणून बाबासाहेबांनी आयुष्याची लढाई जिंकली अशीच सर्वसाधारण भावना आहे. रमाई या त्याग, कष्ट, सहनशीलता या गुणांच्या प्रतीक झाल्या. त्यांनी त्यांच्या फक्त सदतीस वर्षांच्या आयुष्यात दु:ख आणि फक्त दु:ख सहन केले. रमाई ही तशी अनाथ पोर. रमाई यांचे भीमरावांसोबत लग्न झाले तेव्हा त्यांचे वय होते नऊ वर्षे. बालिकाच ती...

छेदी जगन – आधुनिक गायानाचे शिल्पकार (Chhedi Jagan – Architect of Modern Guyana)

वेस्ट इंडिजमधील गायाना, त्रिनिदाद हे देश भारतीय लोकांना क्रिकेटमुळे परिचित आहेत. व्ही. एस. (विद्याधर सुरजप्रसाद) नायपॉल हे मूळ भारतीय होते. ते त्रिनिदादचे नोबेल विजेते लेखक होते. त्यांची पुस्तके भारतात विशेष लोकप्रिय झाली होती. मागील पिढीतील क्रिकेटचे फिरकी गोलंदाज सुभाष गुप्ते हेदेखील त्रिनिदादमध्ये स्थायिक झाले होते. छेदी जगन हे गायानाचे पहिले पंतप्रधान मूळ भारतीय वंशाचे होते...

नाना साठे प्रतिष्ठान : पुढे नेण्यासाठी वारसा (Passing on the legacy)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे घर, स्वतःची नोकरी आणि व्यवसाय या परिघाबाहेर सहसा कोणी जात नाही, कारण ते सारे एकत्रितपणे सांभाळणे हीच तारेवरची कसरत असते ! परंतु या विधानाला काही अपवाद असतात. ठाण्यातील कौस्तुभ साठे हे त्यांपैकी एक. ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ या कंपनीमध्ये ‘पोर्टफोलिओ मॅनेजर’ या पदावर कार्यरत असणाऱ्या कौस्तुभ साठे यांचे त्यांच्या समाजकार्याबद्दलचे हे मनोगत...