महाराष्ट्रातल्या गावखेड्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पसरलेले मराठी उद्योजक, खेळाडू, कलाकार, विचारवंत, अभ्यासक, संशोधक अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती येथे प्रसिद्ध केली जाते.
हरखचंद सावला यांचे व्यक्तिमत्त्व परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात राहणाऱ्यांना नवीन नाही. पांढरा शुभ्र पायजमा-कुर्ता, प्रसन्न चेहरा ही त्यांची पहिली ओळख. ते कर्करोगग्रस्तांची...
समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या जीवनात कर्मयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि कलात्मकता यांचा विलोभनीय संगम दिसतो. त्यांनी तो संगम सार्वजनिक जीवनात वावरताना साधला होता. त्यांच्या भाषणात, लेखनात, संवादात विचारांचे धागे बांधेसूदपणे अन् कलात्मकतेने विणलेले आढळतात. त्यात बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्धता आणि विवेकाचे भान यांचा अनुभव येतो...
मधू दंडवते यांचे नाव संसदेत ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये आवर्जून घेता येईल. ते लोकसभेवर राजापूर मतदार संघातून जवळजवळ वीस वर्षे सातत्याने निवडून आले. त्यांनी जनता पक्षाचे सरकार केंद्रात आले तेव्हा मंत्रिपदही भूषवले. दंडवते यांनी मोरारजी देसाई यांच्या सरकारात रेल्वे मंत्री म्हणून (1977) त्यांचा कार्यकाळ गाजवला. त्यानंतर ते व्ही.पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. ते व्यवसायाने प्रोफेसर होते. मधू दंडवते यांची जन्मशताब्दी 21 जानेवारी 2024 रोजी साजरी झाली...
तो 1980 चा काळ. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाने महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्याच दरम्यान पन्नालाल सुराणा आणि रंगा वैद्य यांच्या...
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुळकर्णी व प्रकाश चांदे या मंडळींचे संपादकीय साहाय्य लाभले. त्यांनी अनेक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आठवणींतून; तसेच, तत्कालिन वर्तमानपत्रांच्या कात्रणांतून विवेक यांचा आयुष्यक्रम रेखाटला आहे. विवेक यांनी १९४४ पासून १९८१ पर्यंत शहात्तर चित्रपटांत काम केले. त्यांचे १९५३ साली आलेले ‘देवबाप्पा’ (दिग्दर्शक राम गबाले) आणि ‘वहिनींच्या बांगड्या’ (दिग्दर्शक शांताराम आठवले) हे चित्रपट खूपच गाजले...
“जनूक बदललेले (जीएम) अन्न धोकादायक आहे हा समज खोटा आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. तेव्हा अशा गैरसमजुतींना जगातील राजकारण्यांनी पाठिंबा देऊ नये. विकसनशील...
रा.वि.भुस्कुटे ऊर्फ भाऊ भुस्कुटे यांचे जीवितकार्य 16 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आले. त्यावेळी ते पंच्याण्णव वर्षांचे होते. ते त्यांच्या ध्येयासाठी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत जगले आणि झटले.
सर ज.जी. उपयोजित कला संस्थेचे (जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट) ग्रंथपाल म्हणून काम केलेले सुधाकर शांताराम क्षीरसागर हे पुस्तकवेडे आहेत. उपयोजित कलेची लायब्ररी सुरू...
रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली...
निवृत्ती महाराज शिंदे ह्या समाजाला वाहून घेतलेल्या एका अवलिया व्यक्तीची भेट नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खडकमाळेगाव गावात झाली. ते स्वार्थापासून निवृत्त झालेले व परमार्थासाठी...