Home Authors Posts by रंजन जोशी

रंजन जोशी

4 POSTS 0 COMMENTS
रंजन जोशी हे उपयोजित कलेच्या क्षेत्रात चित्रकार, अभ्यासक व शिक्षक आहेत. त्यांनी परदेशी कला संस्थांच्या दृककला शिक्षण उपक्रमामध्ये ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी ‘ग्रंथाली’च्या सुमारे सत्तर पुस्तकांची व अन्य प्रकाशन संस्थांसाठी मुखपृष्ठ चित्रे केली. जोशी यांची हास्यचित्रे ‘एपिडी प्रकाशन’ या जर्मनीच्या संस्थेने दहा वर्षे युरोपमध्ये प्रकाशित केली आहेत. त्यांनी ‘दृक समांतर संस्कृतीचे रंग’ या विषयावर फ्रेंच चित्रकार सॅविग्नॅक व महाराष्ट्रातील हास्यचित्रकार शि.द. फडणीस यांच्या कलानिर्मितीवर आधारित शोधनिबंध फ्रान्समध्ये सादर केला होता. त्यांच्या ‘ॲटम फॉर पीस’ या भित्तिचित्राला पंधराव्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात राज्य पुरस्कार मिळाला.

शि.द. फडणीस : हास्यचित्रांची वैश्विकता (S D Phadnis – Painter who spreads smile through...

0
शि.द. फडणीस शंभर वर्षांचे झाले. म्हणजे त्यांचा शताब्दी वर्षांत प्रवेश होत आहे. त्यांचा जन्म 29 जुलै 1925 चा. त्यांचा आता आतापर्यंत सार्वजनिक कलाजीवनात सहभाग असे; अजूनही व्यक्तिगत गाठीभेटी, संभाषणे करतात. फडणीस यांनी त्यांच्या हास्यचित्रांद्वारे मराठी माणसांच्या मनात हास्य गेल्या शतकाची साठ-सत्तर वर्षे पसरवले, आनंदच आनंद निर्माण केला ! त्यांनी मासिके-दिवाळी अंकांमध्ये, कथा-कादंबऱ्यांसाठी; इतकेच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी मनोवेधक व्यंग/हास्यचित्रे काढली. ती विलक्षण लोकप्रिय झाली. शि.द. यांच्या ‘मिस्कील गॅलरी’ स्वरूपाच्या चित्रांनी मराठी आणि एकूण भारतीय हास्य व व्यंग चित्रकलेत ठसठशीत ठसा निर्माण केला आहे...

जोश्यांचे जनुक चित्रकलेचे! (Art is in the DNA of Joshi Family)

16
माझे आजोबा हे काही मोजक्या घरांसाठी गणपती करत असत. लहानसा कारखाना असे त्याचे स्वरूप होते. त्यांच्याकडे ही शिल्पकला पणजोबांकडून आली असावी. माझे पणजोबा चित्रकार होते असे म्हणता येईल.
_Ganesh_Devi.jpg

गणेश देवींची चिताऱ्याची रंगपाटी!

1
‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ या प्रकल्पात गणेश देवी आणि त्यांच्या टीमने केलेले काम विलक्षण आहे. गंमत अशी, की त्या प्रकल्पामध्ये रंग व भाषा ह्यांचादेखील आढावा...

सतीश नाईक नावाचा झपाटलेला…

33
मी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या कंपाऊंडमध्ये विशिष्ट प्रेरणेने झपाटलेले काही विद्यार्थी १९७२ ते १९७७ च्या काळात पाहिले! त्यातील सतीश नाईक हे एक...