Home Search

मुंबई - search results

If you're not happy with the results, please do another search

आर्ट डेको वास्तुरचना, मुंबई (Art Deco Architecture, Mumbai)

आर्ट डेको ही वास्तुरचनेची एक शैली आहे. अनेक वास्तुरचना शैलींचा मेळ घालणारी ही शैली विसाव्या शतकाच्या मध्यावर लोकप्रिय झाली. इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबईमध्ये प्रचलित असलेल्या व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या तुलनेत आर्ट डेको ही शैली आधुनिक समजली जात असे. मुंबईमध्ये त्या पद्धतीने बांधलेल्या दोनशे इमारतींची नोंद झाली आहे. आर्ट डेको इमारती असलेला तो सर्व भूभाग 2012 नंतर ‘आर्ट डेको प्रेसिन्क्ट’ म्हणून मान्यता पावला आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. मुंबई हे सर्वात जास्त संख्येच्या, सार्वजनिक सहभाग असलेल्या आर्ट डेको इमारती असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून मान्यता पावले आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतील मायामी शहर आहे...

मुंबई नगरीतील महापालिका (Brihanmumbai Mahanagarpalika Building in Mumbai)

1
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लांबलचक नावाच्या रेल्वेस्टेशनवर पहिल्यांदा उतरणारा माणूस अनेक गोष्टींना बिचकतो, चकित होतो. मग ती त्या स्टेशनची भव्य इमारत, तिथली गर्दी असो की स्टेशनबाहेर पडल्यावर दिसणारी मुंबई महापालिकेची इमारत ! स्टेशनच्या दोन्ही दिशांना अनेक वारसा इमारती म्हणजे हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, ज्या आवर्जून बघायला हव्यात. त्यातील अनेक इमारतींमध्ये सर्वसामान्य मुंबईकर काम करत असतात पण ते रोजच्या जगण्याच्या लढाईत इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या कार्यालयाची इमारतही ते साक्षेपाने बघत नाहीत. ‘मुंबई नगरीतली महापालिका’ या लेखात मुंबई महापालिकेच्या भव्य ऐतिहासिक इमारतीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली आहे...

माझी मुंबई (My Mumbai)

1
मुंबई शहराच्या पोटात अनेक मुंबई आहेत. संध्याकाळच्या समुद्रावर दिव्याच्या लखलखटाने उजळलेली मुंबई, उदास काळोखात तेवणारी मुंबई आणि अंधारात बुडून गेलेली भयावह मंबई यांची प्रतिबिंबे तरंगत असतात. त्यांची आपापसात सरमिसळ होत असते. अशी ही मायारूपिणी मुंबई हेच अनेकांचे ‘गाव’ असते. त्याचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान प्रत्येकाला आपापल्या नजरेतून दिसतो. अशा या ‘गावाची’ विविध रूपे एकत्र करून एक कोलाज तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी मानस आहे...

मंगेश मुंबईकर घोगरे (Mangesh Mumbaikar Ghogre)

जगभरच्या देशांतून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. त्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा जारी केले जातात. त्यात EB-1A नावाची एक श्रेणी असते. त्याला ‘आइनस्टाईन व्हिसा’ म्हणतात. तो व्हिसा असामान्य क्षमता, कौशल्य असणाऱ्या गैर-अमेरिकनांना कायमस्वरूपी निवासासाठी दिला जातो. आइनस्टाईन व्हिसा मिळालेल्या मंगेश घोगरे यांच्याविषयी जाणून घेऊया...

मुंबई दूरदर्शनवरील मराठी झेंडा (Marathi flag on Mumbai Doordarshan)

0
मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुरुवातीला त्यावर केवळ एक चॅनेल होते. त्यावर कोकणी बातम्या नियमित व सिंधी कार्यक्रमही होत असत. पण त्याचा मराठी प्रेक्षकांना फारसा आनंद लुटता येत नसे...
-fort

मुंबईची तटबंदी

पोर्तुगीजांनी इसवी सन 1686-1743 च्या दरम्यान बांधलेली फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली;...
-flora-fountain

फ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव

फ्लोरा फाउंटन या शिल्पाकृतीचे समाजमनातील स्थान दीडशे वर्षें कायम आहे. त्याचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण साठ वर्षांपूर्वी झाले. तरी तो चौक फ्लोरा फाउंटन या...

मुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य

मुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा...
_Welington_Fountain_1.jpg

वेलिंग्टन फाउंटन – मुंबईचा सौंदर्यपूर्ण वारसा

मुंबईच्या ‘रिगल’ चौकातील सुंदर कारंजे दिसते का? मुंबईच्या वेलिंग्टन फाउंटनला ‘युनेस्को’चा 2017 सालचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. मुंबई फोर्टभोवतालची तटबंदी 1686-1743 च्या दरम्यान बांधली...
_Parasi_Bawdi_1.jpg

मुंबईची पारसी बावडी – समाजऋण आणि श्रद्धास्थानही

0
मानवी वस्तीत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहान-मोठ्या विहिरींची निर्मिती होणे स्वाभाविक होते. त्यांतील काही विहिरींना त्यांच्या कलापूर्ण वास्तुरचनेने सर्वत्र मान्यता प्राप्त झाली. काही विहिरी तर...