Home गावांच्या अंतरंगात

गावांच्या अंतरंगात

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...

श्रीरामवरदायिनी – श्री क्षेत्र पार्वतीपूर

श्री क्षेत्र पार्वतीपूर (पार) हे गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. ते महाबळेश्वर-पार या रस्त्याने महाबळेश्वरपासून वीस मैलांवर लागते. ते महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे. ते सातारा जिल्ह्यात येते. तो परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे, पण गावाला महात्म्य श्रीरामवरदायिनी देवीच्या सुंदर, पुरातन अशा मंदिराने लाभले आहे...

बेणीखुर्दचे कालभैरव- योगेश्वरी मंदिर (Benikhurd’s Kalbhairav- Yogeshwari Temple)

1
कालभैरवाची मंदिरे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेत. त्यांची नावे ज्योतिबा, भैरोबा, खंडोबा आणि रवळनाथ अशी आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील बेणीखुर्द येथील कालभैरव- योगेश्वरीचे देवस्थान ही त्या आसमंतातील लोकांची ग्रामदेवता आहे, मात्र ते कुलदैवत शेरे, दळी, कुष्टे आणि बाहेरून कोकणात येऊन स्थायिक झालेले खेर व हर्डीकर ह्या घराण्यांचे आहे. खेरांचे मूळ गाव अंबाजोगाई. ते अंबाजोगाईकडून कोकणात आले, म्हणून तेथील देवता जोगेश्वरी-कालभैरव ही त्यांची कुलदेवता झाली...

महाराष्ट्राच्या सीमेवरील होट्टलची बुट्टीजत्रा (Hottal fair brings Lingayats from three states together)

होट्टल गावाची ख्याती शिवमंदिरांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. तेथे चार भव्यदिव्य शिवमंदिरे आढळतात- सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर अशी त्यांची नावे. शिवमंदिरांची उभारणी अकराव्या शतकात झाली. नितांतसुंदर अशा शिल्पकलेने नटलेली अशी ती शिवमंदिरे आहेत. होट्टल ही कल्याणीच्या चालुक्यांची उपराजधानी होती. बदामी ही मुख्य राजधानी होती. होट्टलची बुट्टीजत्रा ही आगळीवेगळी आहे...

फलटणचे हरिबुवा समाधी मंदिर (Haribuva Samadhi Mandir at Phaltan)

फलटणच्या भूमीतील अनेक सत्पुरूषांपैकी सद्गुरू हरिबुवा यांचे स्थान वेगळे आहे. ते फलटणमधील लोकांच्या उद्धारासाठी प्रकट झाले अशी लोकभावना आहे. लोक त्यांना ईश्वरी अवतारच मानतात. हरिबुवा यांची मूळ समाधी जेथे बांधण्यात आली आहे तेथील समाधीचा आतील गाभारा स्वच्छ आहे. महाराजांची समाधी त्या मधोमध आहे. त्यांच्या दोन पादुका त्यावर कोरलेल्या आहेत...

फलटणचे भणगे दत्त मंदिर (Datta temple of Bhanage family is phaltan’s treasure)

फलटणचे दत्त मंदिर 29 एप्रिल 1912 (शके 1834) रोजी स्थापन करण्यात आले आहे. दत्तमंदिराला एकशेदहा वर्षे होऊन गेली आहेत. दत्त मूर्ती एकमुखी आहे. ती गंडकी शिळेची, सहा हातांची आहे. शंकर मार्केटसमोर भणगे वाडा आहे. वाडा संपूर्ण लाकडी व टोपण माचीचा असून बांधकाम घाणीच्या चुन्यातून केलेले होते...

घुमान – नामदेवांचे तीर्थक्षेत्र (Saint Namdev in Punjab)

पंजाबमधील घुमान ही संतशिरोमणी नामदेव महाराजांची कर्मभूमी. नामदेवांनी घुमान हे गाव वसवले. तेथे तब्बल चोवीस वर्षे तपश्चर्या केली. तो परिसर त्यांच्या वास्तव्याने आणि तपाचरणाने पावन झाला. घुमान हे गाव संत नामदेवांचे गाव म्हणून ओळखले जाते...

मोराणे सांडस : काय कमावले, काय गमावले ! (Morane Sandas- Village in change)

0
मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे...

मसुरेची भराडीदेवी यात्रा (Masure’s Bharadidevi Festival)

0
मसुरे गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे आंगणेवाडी येथील भराडीदेवीचे मंदिर आणि तेथे फेब्रुवारी-मार्च दरम्यान भरणारी दरवर्षीची देवीची जत्रा. भराडीदेवीविषयी कथा अनेक प्रचलित आहेत. त्यांपैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. स्वतः चिमाजीअप्पांना एका मोहिमेदरम्यान भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभला होता. म्हणून त्यांनी बावीस हजार एकर जमीन देवळासाठी दान केली...

वडखळ… एक हरवलेला थांबा ! (Wadkhal lost its significance in Mumbai-Goa road development)

0
वडखळचा थांबा ! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा त्या गावाशी नक्की परिचय असेल. पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून सात-आठ किलोमीटरवर असलेले ते गाव एरवी दुर्लक्षित राहिले असते, पण मुंबई-गोवा महामार्गाने त्या गावाला ओळख दिली. कोकणात जाणारी गाडी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते, पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासी गार हवा आल्याने सुस्तावतात, ते पेणचा स्टँड येईपर्यंत...