Home Authors Posts by प्रकाश पायगुडे

प्रकाश पायगुडे

1 POSTS 0 COMMENTS
प्रकाश पायगुडे हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाहक आहेत. त्यांनी विविध नियतकालिकांत स्तंभलेखन केले आहे. ते ‘आमचा प्रतिनिधी’ या मासिकाचे संपादक आहेत. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संगीत महोत्सव, ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव यासारख्या अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत सूत्रसंचालन तसेच, आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. पायगुडे यांनी अशी पाखरे येती, गारंबीचा बापू, आग्र्याहून सुटका आणि बदाम राणी, चावट गुलाम या नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांची साहित्य वारी, घुमान द्वारी आणि रोटरी संघटना... इतिहास व कार्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

घुमान – नामदेवांचे तीर्थक्षेत्र (Saint Namdev in Punjab)

पंजाबमधील घुमान ही संतशिरोमणी नामदेव महाराजांची कर्मभूमी. नामदेवांनी घुमान हे गाव वसवले. तेथे तब्बल चोवीस वर्षे तपश्चर्या केली. तो परिसर त्यांच्या वास्तव्याने आणि तपाचरणाने पावन झाला. घुमान हे गाव संत नामदेवांचे गाव म्हणून ओळखले जाते...