Home Authors Posts by माणिक वालावलकर

माणिक वालावलकर

1 POSTS 0 COMMENTS
माणिक वालावलकर-गावकर यांचे कलाशिक्षण बीएफए, एमएफए सर ज. जी. कलामहाविद्यालयातून झाले. त्यांनी महाराष्ट्रातील पिंगुळी चित्रकथी या लोककलेवर संशोधन करून एस एन डी टी विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी वृत्तपत्रांत, चिन्ह व इतर कला प्रकाशनांमध्ये कला विषयक लेखन केले आहे. त्या दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट येथे कला अध्यापक म्हणून 2005 पासून कार्यरत आहेत. त्यांचा एमजीएम विद्यापीठ, (महागामी) औरंगाबाद येथील विविध शैक्षणिक उपक्रमांत सहभाग आणि परफॉर्मिंग आर्ट विभागासाठी बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये कार्यरत आहेत.

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...