Tag: Konkan
आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)
विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...
आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)
प्राचीन दाभ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले !...
बिळवसचे सातेरी देवीचे जलमंदिर (Sateri Temple surrounded by water at Bilwas-Konkan)
कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरांपैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे - त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. ती मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी उभारले आहे !...
कोकण आणि कॅलिफोर्निया ! (Konkan And California)
कोकण आणि कॅलिफोर्निया अशी तुलना हल्ली होत नाही. पूर्वी म्हणजे ज्यावेळी कोकणाला उघड उघड दरिद्री संबोधले जाई, त्या काळी नेहमी कोकणासमोर कॅलिफोर्नियाचा आदर्श ठेवला जात असे...
निसर्गाने वेढलेले देवरुख (Devrukh)
देवरूखबद्दल असे सांगितले जाते, की प्रत्यक्ष देवांच्या वास्तव्याने ती भूमी पावन झाली आहे! बहिणाईने ‘देऊळातल्या देवा या हो, उतरा ही पायरी’ असे आळवूनसुद्धा जे देव भूतलावर थांबले नाहीत, ते देव स्वेच्छेने ज्या ठिकाणी राहून गेले ते गाव म्हणजे देवरूख! देवरुख या गावाचा तालुका संगमेश्वर असला तरी तालुक्याचे गाव म्हणून ओळख आहे ती देवरुख ह्या शहराचीच; असे महत्त्व त्या शहरास लाभले आहे. देवरूख या नावाची उत्पत्ती आणखी एका पद्धतीने आहे. वड आणि पिंपळ यांची मोठमोठी झाडे त्या गावाच्या चारही बाजूंना आहेत. वड आणि पिंपळ यांना भारतीय संस्कृतीत ‘देववृक्ष’ मानले जाते. ‘देववृक्षांचे गाव’ याचा अपभ्रंश होत होत गावाचे नाव ’देवरूख’ झाल्याचे सांगितले जाते...
रवळनाथ – लोकदेव व क्षेत्रपाळ
यक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट...
पुस्तकवेडे गायकरकाका!
दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू...
निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद...
कोकणातील गाबित शिमगोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...
कोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...