Home Authors Posts by बिपीन शहा

बिपीन शहा

1 POSTS 0 COMMENTS
बिपिन शहा हे विसापूर गावचे. ते होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते कोकणात बावीस वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा विविध सांस्कृतिक उपक्रमांत सहभाग असतो. ते सतत विविध स्पर्धांत सहभागी होतात.

विसापूर – दापोलीच्या छायेत

विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...