Home Authors Posts by प्रसाद बर्वे

प्रसाद बर्वे

2 POSTS 0 COMMENTS
प्रसाद बर्वे हे फ्रेंच भाषेचे प्राध्यापक, प्रशिक्षक, अनुवादक, संशोधक आणि दुभाष आहेत. त्यांनी वारसा स्थळांच्या शोधात भारत, फ्रान्स आणि बांग्लादेशमध्ये प्रवास केला आहे. त्यांना इंडो-इस्लामिक आणि वसाहत काळातील वास्तुशैलीमध्ये विशेष आवड आहे. त्यांचे शोधनिबंध आणि लेख स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.

आदिलशाही स्थापत्यशैली – दाभोळची मशीद (Adilshahi architecture – Dabhol Mosque)

विजापूरची एक राजकन्या आयेशाबिबी (तिला माँ साहेब असेही म्हणत) मक्केला जाण्यासाठी तिच्या लवाजम्यासह (तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार होते) दाभोळ बंदरात येऊन पोचली. त्यावेळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द तेथे चालू होती. एवढ्या लोकांसह एवढा लांब प्रवास करण्यासाठी लागणारी मोठी रक्कम - लाखो रूपयांची संपत्ती तिच्याकडे होती. परंतु तिने तिचा पुढील प्रवास रद्द केला. त्या रकमेचा सदुपयोग करण्यासाठी मौलवी आणि काझी यांच्या सल्ल्याप्रमाणे दाभोळातच एक छान मशीद उभी करावी असे ठरले. त्या मशिदीचा स्थपती होता कामिलखान...

आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)

प्राचीन दाभ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले !...