Home Authors Posts by मोहन देस

मोहन देस

1 POSTS 0 COMMENTS
मोहन देस यांनी सतरा वर्षे मुंबईत डॉक्टरकी केली. ते 1993 पासून जनआरोग्यवास म्हणजे लोकांमध्ये, शहरी वस्त्या, ग्रामीण आदिवासी भागांत जाऊन आरोग्याची माहिती देण्याचे काम करत आहेत. लोकांना त्यांचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे हे समजावणे म्हणजे आरोग्य संवाद. ते ‘रिलेशानी’ शिबिरे पंधरा वर्षांपासून भरवतात. त्यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार 2004 मध्ये मिळाला आहे. त्यांना चित्रे- गाणी-कविता, स्वयंपाक करणे, प्रवास आणि मैत्री असे छंद आहेत.

आरोग्य भानची गोष्ट (The Story of Awareness of Health)

6
आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान ! लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...