Home Search

राजकीय - search results

If you're not happy with the results, please do another search

मध्यमवर्गीय बौद्धांची जबाबदारी

0
दलित पँथरच्या बहराच्या काळात आणि त्यानंतरही बराच काळपर्यंत, बौद्ध वस्तीत होळी, गणपती, नवरात्र असे सण सार्वजनिक रीत्या साजरे करण्याची कोणाची टाप नव्हती. हिंदू देवतांचे आणि चालीरीतींचे आम्हा बौद्धांच्या घरांतील अस्तित्व समूळ नष्ट करणे हे आमचे परमकार्य होते. त्याची एक झिंग होती. बावीस प्रतिज्ञा अमलात आणणे हे आमचे जीवनसाफल्य होते. आता, त्याच बौद्ध वस्त्यांत तरुणाई आंबेडकर जयंतीच्या बेफाम मिरवणुका डीजे लावून संघटित करते. सगळे रस्ते, गल्ल्या निळ्या होतात. नेत्रदीपक रोषणाई आणि भीमगीते यांनी माहोल उत्साहाने ओसंडत असतो...

नवा मानुष वाद

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. ‘नवा पुरुष’ समाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे ‘नवे’पण सार्वजनिक होऊन जावे...

एकविसाव्या शतकातील स्त्री-पुरुष संबंध

जागतिकीकरणाच्या तीन दशकांत झालेल्या अनेक बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा व मूलभूत बदल भारतीय समाजाच्या लैंगिकताविषयक धारणा व प्रत्यक्ष व्यवहार ह्यांत घडून आला आहे. ह्या परिवर्तनामुळे लैंगिकता व लैंगिक संबंध ह्यांचा पोतच नव्हे, तर आशयदेखील बदलला आहे. जागतिकीकरणानंतर भारतात अनेक पातळ्यांवर परिवर्तन झाले. त्यांपैकी काही बदल उत्पाती व प्रपाती स्वरूपाचे आहेत. त्यांतील मूलभूत स्वरूपाचा, पण सर्वात दुर्लक्षित बदल हा भारतीयांच्या लैंगिकताविषयक जाणिवा, धारणा व व्यवहार ह्यांत झाला आहे. त्या प्रक्रियेची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व त्याचे लक्षणीय परिणाम एकविसाव्या शतकात जाणवू लागले. ती प्रक्रिया अजून संपलेली नाही...

गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of India’s value...

1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...

अंधांना डोळे आणि डोळसांना दृष्टी – अत्याळची चळवळ

‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात...

जगाला प्रेम अर्पावे ! (Offer love to the World)

समाजात सगळीकडे अस्वस्थता पसरलेली असताना, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवे? संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या माणसांच्या मनात असा प्रश्न असंख्य वेळा उद्भवतो. त्याचे समी‍करणातून देण्यासारखे उत्तर नाही. समाजाच्या परीघामध्ये ज्ञान, धर्म, राजकारण, लैंगिकता, स्त्री-वाद, पुरुषप्रधानता अशा क्षेत्रांतील विचारांचे सत्य समजून घेण्यासाठी, संकुचित विचार आणि वर्तन याबाबत सजगता येण्यासाठी सर्वांनी कार्यरत झाले पाहिजे...

शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ (The crowning of Shivaji and its meaning)

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अर्थ त्या काळामधील फक्त तिघांना कळला- पहिले स्वत: शिवाजीराजे, दुसरे गागाभट्ट, कारण त्यामुळे काशी मुक्त झाली आणि तिसरा पराभूत औरंगजेब, कारण त्यामुळे भारताच्या विशेषत: उत्तरेकडील वेगवेगळ्या राजांच्या स्वातंत्र्योर्मी जाग्या होत होत्या...

दापोलीचे लोकनेते : बाबुराव बेलोसे (Baburao Belose – The man who shaped Dapoli’s tourism...

कोकणच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया ज्यांनी रचला, अशा महनीय व्यक्तींमध्ये रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते लोकनेते म्हणूनच गणले जातात- लोकांमध्ये मिसळून गेलेला असा पुढारी विरळाच. कोकणच्या समस्या बाबुरावांनी धाडसाने व तडफदारपणे विधानसभेत मांडल्या – त्यांचा पाठपुरावा केला. म्हणून त्यांना त्यांचे सहकारी ‘कोकणची सिंहगर्जना’, ‘कोकणची धडाडणारी तोफ’ असे म्हणत असत...

फलटणचे दीडशे वर्षांचे वाचनालय (Phaltan public library celebrates 150 years of its foundation)

फलटण संस्थानामध्ये एकोणिसाव्या शतकात वाचनालयाची स्थापना झाली. ती कामगिरी संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांची. तेव्हा तिला ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे म्हटले गेले. स्थापना दिन आहे 9 ऑगस्ट 1870. म्हणजे लायब्ररीला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. तालुका पातळीवरील वाचनालय हे त्या काळी अप्रूप होते. मुधोजीराजांनी दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ वाचनालयात संग्रहित केले. ते जुने ग्रंथ हे त्या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते ग्रंथ जतन करण्यात आले आहेत...

स्थलांतरित आणि निर्वासित (The difference between immigrants and Refugees)

मानववंश आफ्रिकेत लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला. मानवी समूह तेथे घडून तेथून जगभरातील अनेक भूखंडांत स्थलांतरित झाले. त्या समूहांनी तेथे तेथे रहिवास करून त्या त्या ठिकाणाला त्यांची जन्मभूमी मानले. त्यातूनच पुढे, अनेक वेगवेगळ्या भूभागांमध्ये संस्कृती विकसित होत गेल्या आणि तेथे यथाकाल देशांची निर्मिती झाली- देशांच्या सीमा ठरल्या गेल्या. तो विकास समूह व्यवस्था(पन), ग्राम व्यवस्था, राज्य व्यवस्था आणि राष्ट्र व्यवस्था असा सांगितला जातो. त्यातूनच एकेकट्या कुटुंबांची प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील अधिसत्ता निर्माण झाल्या. ती राजेशीही होय. राजेशाहीचा अस्त जगातील बहुतांश देशांत एकोणिसाव्या व विसाव्या शतकात होऊन लोकशाही सत्ताप्रणाली जगभर प्रस्थापित झाली...