Home Search

परंपरा - search results

If you're not happy with the results, please do another search
‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तकाचे मुखपृष्ठ

अहिराणी लोकपरंपरा

सुधीर देवरे यांनी ‘अहिराणी लोकपरंपरा’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांचे जन्मगाव विरगावातील अनुभवसमृद्धीचे शब्दचित्र रेखाटले आहे. त्यावरून त्यांनी पुस्तकाची निर्मिती त्यांची अनुभूती, लोकसाहित्याबद्दल आस्था, ती...

आमची गाणपत्य परंपरा

     आमचे कुलदैवत गणपती आणि कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई. या उपासनेमुळे आम्ही स्वत:ला गाणपत्य म्हणवतो. गणपतीचा आगमाधिष्ठित असा संप्रदाय दक्षिणेत आहे; कदाचित काळाच्या ओघात तशी...
carasole

मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा

तीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला सरदार मुजुमदारांचा गणपती उत्सव म्हणजे अवघ्या पुण्याचे भूषण! छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे व सुपे या...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची माहिती दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...

पन्नासावे साहित्य संमेलन (Fiftieth Marathi Literary Meet 1974)

सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्यसंमेलनाच्या (इचलकरंजी, 1974) अध्यक्षपदाचा मान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळाला होता. ते त्यांच्या आद्याक्षरांवरून पुलं म्हणूनच ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबई येथे 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले. त्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार फार प्रसृत नव्हता. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्रापुरते त्या प्रकाराचे प्रवर्तक म्हणता येईल. ते ग्रेट एंटरटेनर होते...

नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...

म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)

म्हण’ या शब्दाची निर्मिती संस्कृतमधील ‘भण’ या धातूचा अपभ्रंश होऊन झाली आहे. म्हण ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’...

वेदपाठशाळांची आजही गरज (Schools for studies of Vedas are necessary)

देशातील वेदांचे अध्ययन आणि अध्यापन यांची परंपरा ही ऋषी-मुनी आणि वैदिक यांनी जोपासली. त्यासाठी गुरुकुल पद्धतीच योग्य आहे. वेदांचे सूत्र आहे. त्याच पद्धतीने वेदांचे अध्ययन होणे अपेक्षित आहे. पुण्याच्या वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी असे मत मांडले आहे. त्यांनी महाराष्ट्रात ऐंशी पाठशाळा तर गोव्यात पाचसहा पाठशाळा कार्यरत आहेत. देशभरात सुमारे चार हजार वेदपाठशाळा सुरू आहेत असा अंदाज सांगितला आहे.

विनोबा, बाळकोबा, शिवबा – भावेबंधूंची अद्भुत त्रयी !

महाराष्ट्राच्या परंपरेत निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांची एक अद्भुत त्रयी आहे. तसे नवल महाराष्ट्र देशी पुन्हा, सातशे वर्षांनंतर घडले ! कोकणात पेणजवळील गागोदे गावी (रायगड जिल्हा) विनायक, बाळकृष्ण आणि शिवाजी हे तीन भाऊ नरहर भावे यांच्या घरी जन्माला आले. विनोबा मोठे आहेत, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान यांच्या मुक्ताबाईसारखी भावे बंधूंची एक भगिनी- शांता ही होती. शांताला तिच्या जीवनाची वाट स्वतंत्रपणे चालावी लागली. तिन्ही भावेबंधूंनी लौकिकाला अभिवादन करून अध्यात्मवाटेवर वाटचाल केली. मोक्ष हे त्यांचे लक्ष्य होते. ब्रह्मजिज्ञासा हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता...

रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख यांचे वारीनृत्य

वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण राजुबाबा शेख यांनी वारीनृत्य महाराष्ट्रात लोकप्रिय केले. वारीनृत्याची कल्पनाच त्यांची. राजुबाबा कीर्तन, अभंगगायन लहानपणापासून करत, पण त्यांना वारीनृत्याची कल्पना गुजरातचे कलावंत शेखावत यांच्याकडून मिळाली. शेखावत त्यांच्या भवनीभवई प्रयोगात पितळी परातीत नृत्य करत गात; कधी तलवारीच्या पात्यावर त्यांचे नृत्य असे. राजुबाबा यांनी ताटलीत नाचत अभंग गाण्याचा प्रयोग सुरू केला. नंतर ते डोक्यावर कळशा/हंडे यांचे तीनचार थर घेऊन नृत्यगायन करत आणि भक्तिरसात डुंबून जात. त्यांचा तो खेळ लोकप्रिय झाला...