आठवणीतले वाटूळ

वाटूळ हे वारकऱ्यांचे गाव ! पवित्र तो देश, पावन तो गाव | जेथे हरीचे दास जन्मा येती || आषाढी-कार्तिकी पायी वारी. कीर्तनात रममाण होऊन नाचणारे कीर्तनकार आणि कीर्तन ऐकण्यासाठी जमलेले आबालवृद्ध... माझ्या आजी, काकी नऊवारी साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन कीर्तनात तल्लीन झालेल्या आठवल्या की जाणवते तोच खरा वाटूळगावचा इतिहास ! निसर्ग म्हणजे काय हे कळण्याइतके वय नव्हते तेव्हा ! पण पाखरांचा किलबिलाट, ऋषीमुनींप्रमाणे ध्यानस्थ बसलेले डोंगर आणि मध्येच झुळझुळ वाहणारी नदी दिसली की मन प्रसन्न होत असे. तांबडे फुटले, की पूर्व दिशा उजळून निघायची आणि थोड्याच वेळात ताऱ्यांचा लालभडक सखा डोके वर काढायचा... अहाहा !! खूप सुंदर सूर्योदय ...

वाटूळ ! (Watul Village)

विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच...

पन्नासावे साहित्य संमेलन (Fiftieth Marathi Literary Meet 1974)

सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्यसंमेलनाच्या (इचलकरंजी, 1974) अध्यक्षपदाचा मान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळाला होता. ते त्यांच्या आद्याक्षरांवरून पुलं म्हणूनच ओळखले जातात. त्यांचा जन्म मुंबई येथे 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकवले. त्या काळात स्टॅण्डअप कॉमेडी नावाचा प्रकार फार प्रसृत नव्हता. पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्रापुरते त्या प्रकाराचे प्रवर्तक म्हणता येईल. ते ग्रेट एंटरटेनर होते...

आवाहन

लोकप्रिय लेख

पर्वतातील गाव – वसईचे गिरीज !

गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज...

व्यक्ती

संस्था

वैभव

गावगाथा

सद्भावनेचे व्यासपीठ

मोगरा फुलला

मराठीकारण

शिक्षकांचे व्यासपीठ

मंथन

Youtube व्हिडियो

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प

लोकशाही सबलीकरण अभियान