Home Authors Posts by वसुधा सहस्रबुद्धे

वसुधा सहस्रबुद्धे

1 POSTS 0 COMMENTS
वसुधा सहस्रबुद्धे यांनी ‘हिंदी नाटक’ या विषयावर पीएच डी 1991 मध्ये केली आहे. त्यानंतर, त्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये (फोर्ट) हिंदी विभागात प्राध्यापक होत्या. त्यांनी हिंदी कथा, कादंबरी व नाटक यांचे मराठी भाषेत आणि काही मराठी नाटकांचे हिंदी भाषेत अनुवाद केले आहेत. सहस्रबुद्धे या स्फूट लेखन व एकपात्री प्रयोग या प्रकारांतून मोठ्या व्यक्तींचा परिचय करून देत असतात.

महापालिकेत मराठी : मृणाल यांची मोहीम (Marathi in Municipal Corporation of mumbai : Mrunal...

मी वसुधा सहस्रबुद्धे. माझे माझ्या देशावर, महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम आहे. परंतु मधल्या काळात राजकारणात इतक्या विचित्र अनाकलनीय घटना घडल्या, की मला भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटले. त्यावेळी जनसेवेचे व्रत घेतलेल्या मृणाल गोरे यांची आठवण झाली. सध्याच्या तरुण पिढीला गोरे यांच्या निःस्पृह, निर्भय व आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यावी असे वाटले. अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय एकपात्री प्रयोगातून सर्वांसमोर मांडावा असा प्रयत्न आहे. मनात असा विश्वास वाटला, की आजही एखादे असे व्यक्तिमत्त्व निर्माण होईल, की जे सर्वांना एकत्र घेऊन फक्त जनतेसाठी काम करेल ! त्यामुळेच मी मृणाल गोरे यांचे संघर्षपूर्ण जीवन काही प्रसंगांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...