Home सद्भावनेचे व्यासपीठ

सद्भावनेचे व्यासपीठ

जंगलचा कायदा ! अर्थात ‘जंगल का कानून’ (Laws of Jungle)

7
‘यहा जंगल का कानून नही चलेगा’, ‘जंगलराज’ किंवा कसला ‘जंगली’ माणूस आहे अशा संबोधनांनी जंगलांना आणि जंगलातील एकूणच व्यवस्थांना कोणी हिणवते, तेव्हा त्या माणसाच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. खरे तर, जंगलांइतकी कायदा आणि सुव्यवस्था माणसांच्या दुनियेत क्वचितच पाहण्यास मिळते. मुख्य म्हणजे, जंगलातील हे कायदे-कानून गेली लाखो वर्षं अव्याहतपणे पाळले जातात...

खोंगा खोंगा साखर

आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही...

अनुश्री भिडे यांची हृदयाची भाषा ! (Anushree Bhide’s Language of Heart )

9
कोणत्याही कृतीपेक्षा त्यापाठीचा विचार, ती व्यक्ती नर आहे की नारायण (अथवा राक्षस) ते ठरवतो. गोष्टीतील श्रीमंत बाईसारखे अनेक लोक आजूबाजूला असतात. स्वतःसाठी लक्षावधी रुपयांची उधळण करणारे, पण दुसऱ्याला शंभर रुपये देतानाही हात मागे घेणारे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या वेदनेने दुःखी होणारे, स्वतः उपाशी राहून स्वत:चा घास भुकेल्या जीवांना देऊन तृप्त करणारे पुण्यात्मेही याच जगात दिसतात ! अशा ‘देवमाणसां’तील विठ्ठल-रखुमाईचा एक जोडा म्हणजे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे...

वस्तीमधील उमलणारी फुले

स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...

बुद्धीसवे भावना ! (Emotional quotient is necessary part of logical thinking)

0
सद्भाव मनात असणे ही सहज प्रक्रिया आहे. तो शोधण्यासाठी काहीतरी अद्वितीय करण्याची किंवा त्याचा पाठलाग करण्याची आवश्यकता मुळीच नसते. अवतीभवती घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांतूनदेखील व्यक्तीवर सद्भावनेचा सखोल परिणाम होत असतो. प्रवासात भेटणारी माणसे, प्राणी-पक्षी-वनस्पती यांना समजून घेण्यासाठी किंवा प्रसंग सहृदयतेने टिपण्यासाठी हवे संवेदनशील मन. त्या मनाला समानानुभूतीने विचार करण्याची क्षमता हवी, जागरूकता हवी आणि समजून घेण्याची कुवतही हवी. तसे संवेदनक्षम मन आणि घटना व व्यवहार यांच्याकडे बघण्याची सजगता असेल, तर कितीतरी गोष्टी शिकवल्या जातात असे सांगणारा स्वप्रचीतीने प्रकट झालेला नीलिमा खरे यांचा हा लेख...

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे...

सुसंस्कृत संवेदनशील माणसांचे नेटवर्क शक्य आहे? (Needed network of well meaning educated people)

सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात संवेदनेचे नेटवर्किंग जाणीवपूर्वक साधले तर आज जाणवणाऱ्या अस्वस्थता, असहाय्यता, हतबलता या भावना नष्ट होऊ शकतील आणि एक सुसंस्कृत संवेदनापूर्ण रसिक समुदाय बांधला जाऊ शकेल अशा तऱ्हेचा अभिप्राय ‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संस्थांनी स्वातंत्र्यदिनी योजलेल्या नागरिकांच्या सभेत व्यक्त झाला. मुख्यत: टेलिव्हिजन व सोशल मीडिया यांच्या द्वारा समाजात जो विखार, विषाद व नकारात्मकता अशा भावना पसरल्या जात आहेत त्या दुर्बल भावनांना चांगुलपणाचे, सज्जनतेचे नेटवर्क हेच उत्तर ठरू शकेल अशा शब्दांत सभेचा समारोप झाला...

दिलासा – रुग्णांच्या चेहऱ्यावरील हसू (Smiles on the faces of patients at Dilasa)

व्याधिग्रस्त वृद्ध लोकांना सांभाळणे, त्यांचे औषधपाणी करणे, त्यांना त्यांचा शारीरिक त्रास, वेदना कमी होण्यासाठी मदत करणे, विकलांग, मतिमंद मुलांना आयुष्य चांगले जगण्याकरता मदत करणे अशी कामे करणारी ‘दिलासा’ ही नाशिकमधील अठरा वर्षे जुनी संस्था आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सतीश जगताप आणि राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उज्ज्वला जगताप या दाम्पत्याने नेहमीच्या वाटा बदलून स्वतःची स्वतंत्र वाट निर्माण केली...

तपस : आई-बाबांचे दुसरे घर (Tapas : My Parents’ Second Home)

आई-वडील वृद्ध झाले आणि ती दोघेच राहत असतील तर त्यांच्या काळजीने मुलींचा जीव व्याकूळ होणारच ! पण त्यांना त्यांचा संसार असतो, संसारातील चढउतार पार करताना, आई-बाबांकडे जसे लक्ष देण्यास हवे तसे लक्ष मुलगा-मुलगी देऊ शकत नसल्याने त्यांच्याही मनाची उलघाल होत असते. त्यांना घर सोडून दुसरीकडे ठेवावे का? या अनुच्चारित प्रश्नामुळेदेखील मन अपराधाने खात राहते. अशा प्रसंगी निर्णय काय घ्यावा? कसा घ्यावा? याबाबत ममता महाजन यांनी लिहिलेला त्यांचा हा अनुभव द्विधा मनस्थितीत असलेल्या अनेकांना विचार करण्यास मदत करेल...

ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप… (Thane Park Discussion Group grows bigger along with the time)

संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत...