छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)
म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
मनमाड आणि गुप्तसर साहिब गुरुद्वारा
महाराष्ट्रातील नांदेड खालोखाल मनमाडमधील गुरुद्वाराला अखिल शीख समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे स्थान आहे. ते गुरुद्वाराला प्रेरणा आणि प्रार्थना स्थळ म्हणून फार मानतात. गुरु गोविंद सिंह नांदेड येथे का आले असावेत याबाबत दोन मतप्रवाह आढळून येतात. एक म्हणजे, महाराष्ट्रातील संत नामदेव यांचे पंजाबमधील महत्कार्य आणि त्यांना तेथे, पंजाब प्रांतात मिळालेला ‘संत शिरोमणी’ असा दर्जा. यांमुळे गुरू गोविंद सिंह संत नामदेवांच्या मूळ स्थानी, नांदेडमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक कारणामुळे आले असावेत असे मानले जाते...
श्रीयोगेश्वरी (अंबाजोगाई) : योगमार्गातील शक्तिपीठ
अंबाजोगाईची श्री योगेश्वरी ही महाराष्ट्रीय देवी भक्तांची श्रद्धेय देवता आहे. ती बहुसंख्य चित्पावन घराण्यांची कुलस्वामिनी कुलदेवताही आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे स्थान महाराष्ट्रात तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. ते अनेक संतांचे वसतिस्थान आहे. देवीची स्थापना दहाव्या-अकराव्या शतकाच्या दरम्यान झाली असावी असे गावात असलेल्या सात शिलालेखांवरून समजते. योगेश्वरीचे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी आहे...
दुर्लक्षित तीर्थक्षेत्र – देवदरी
नांदखेडा हे गाव बदनापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तेथील देवदरी हे बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले चौदाव्या शतकातील महादेव मंदिर आहे. ते निसर्गाच्या कुशीत व डोंगरांच्या रांगेत वसलेले आहे. मात्र मंदिर दुर्लक्षित आहे, कारण ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचा विकास झालेला नाही...
नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. तेथे केदारेश्वरचे जुने मंदिर आहे. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते...
अहमदनगरचा ऐतिहासिक फराहबक्ष महाल
मलिक अहमदने भिंगारजवळ एक किल्ला आणि शहर वसवावे असे ठरवले. त्याप्रमाणे शहर आणि शहरातील वास्तू उभारण्यास 28 मे 1490 या दिवशी सुरुवात केली. अहमदनगर शहरातील तशा वास्तूंपैकी एक आहे फराहबक्ष महाल. त्याला नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखतात. ती नगरमधील सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष आहे...
अप्रसिद्ध रामगड (रामदुर्ग)
‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...
दर्गा – दुला रहिमानशहा
‘दुला रहिमानशहा’ यांचा दर्गा परतवाड्याहून अचलपूर शहराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, बिच्छन नदीकाठी आहे. तो गिझनीचा राजपुत्र. मुस्लीम धर्मीय मंडळी दुला रहिमानशहाला मोठा पीर मानतात. त्या ठिकाणी ‘उरूस’ वर्षातून एकदा भरतो. उरूस म्हणजे पवित्र यात्रा. तो उरूस रबीउल अव्वल महिन्याच्या 12 तारखेपासून भरतो आणि सात दिवस चालतो...
कोकणी घराचा नमुना देगावला (Typical layout of a Konkan house at Degaon)
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले...
पन्हाळेकाजी लेणी समूह : विविध तरी एकात्म ! (Panhalekaji cave sculpture – varied styles...
दापोलीजवळचा पन्हाळेकाजी लेणी समूह म्हणजे भारतातील स्थापत्यकलेत व धार्मिक पंरपरेत बदल कसे होत गेले त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे हीनयान, वज्रयान, शैव, गाणपत्य, नाथ अशा विविध धर्मसंप्रदायांचा वेगवेगळ्या काळातील प्रभाव दिसून येतो. लेणी मोठ्या कालखंडात खोदली गेली, तथापी त्याची शिल्पशैली त्यानुसार विविध तरी एकात्म दिसून येते...