लाडूच लाडू -विचित्र नावांचे स्वादिष्ट लाडू (Laddus with Strange Names)

किती चित्रविचित्र नावांचे लाडू या जगात आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. उदाहरणार्थ, ‘खडखडे लाडू’. मालवण पट्टयात मिळणाऱ्या कडक बुंदीच्या लाडवांना खडखडे लाडू म्हणतात. तेथील लाडू जाड शेवेचे, काजूचे आणि खडखडे लाडू खडखड करत पोराबाळांनी खावेत किंवा दात पडलेल्या म्हाताऱ्याकोताऱ्यांनी वेळ जावा म्हणून चघळत बसावेत किंवा डब्यात खडखड वाजत असावेत म्हणून खडखडे. बेळगावकर सारस्वत लोकांच्या दिवाळीत ‘लडगी लाडू’ असतात. ‘खूळे लाडू’ नावाचे लाडू बेळगाव ते संकेश्वर भागात गणपती विसर्जनाच्या वेळी बनवतात...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...

बेलासीस रोड

स्थानिक इतिहास ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची शाखा आहे. मुंबईच्या इतिहासाचा विविध अंगांनी अभ्यास करणारी काही पुस्तके इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये गेल्या दहा वर्षांत आली आहेत. तरुण अभ्यासक पुढे येत आहेत. अनेक मनोरंजक कथा समोर आल्या आहेत. ‘मोगरा फुलला’ या दालनात वेगवेगळे लेखक ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदरामध्ये मुंबईविषयी लेख लिहितील. यांतील पहिला लेख नितीन साळुंखे यांचा...

प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे

नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...

ओतूरची सांदुरी पुरी

पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर - महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. त्या साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे...

कोजागिरी पौर्णिमा अर्थात मोत्यांची पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. त्या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे...

महाराष्ट्र देशा (My Maharashtra)

29
आमचे गाव सिद्धेश्वर. अंतर पालीपासून दोन किलोमीटर. सिद्धेश्वर हे दुर्वे कुटुंबीयांचे मूळ गाव. त्यामुळे पालीमधील अष्टविनायक आणि देवळामागे उभा असलेला सरसगड अंगणात उभे असल्याप्रमाणे ओळखीचे. पाली या एका गावात इतके काही विखुरलेले, लिहिण्याजोगे आहे तर छत्तीस जिल्हे, तीनशेअठ्ठावन्न तालुके आणि त्यातील सुमारे पंचेचाळीस हजार गावे मिळून बनलेल्या महाराष्ट्रात लिहिण्याजोगे, नोंदी करण्याजोगे किती असेल ! वाटले, ‘मोगरा फुलला’ निमित्ताने उभा महाराष्ट्रच लिही म्हणून मला खुणावत आहे का? ही एक नवी सुरुवात तर नव्हे ?...

शब्द – भटके-विमुक्त (Wandering Words)

या जगात सगळ्यात जास्त भटके-विमुक्त कोण असतील, तर ते म्हणजे भाषेतील शब्द. मानव समाज स्थिर झाल्यानंतर नवनव्या अवजारांचे, नवनव्या तंत्रांचे शोध लागत गेले. गरजेपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागले. माणसाला शिकारी अवस्थेतील खडतर जीवनापासून थोडी मुक्ती मिळाली, कला-कौशल्ये विकसित झाली आणि साहजिकच व्यापाराला चालना मिळाली. भाषांची, शब्दांची देवाणघेवाण व्यापारामुळे जेवढी झाली तेवढी इतर कोठल्याही घटकामुळे झाली नसेल. व्यापारमार्गावर झालेल्या भाषिक देवाणघेवाणीमुळे भारतीय भाषांमध्ये फारसी, अरबी, तुर्की, मंगोल, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पॅनिश भाषांमधील शब्द आढळतात. इंग्रजी शब्दांबद्दल तर बोलायलाच नको...

मोगरा फुलला !

मराठी साहित्यविश्वातील कवयित्री व भाषा अभ्यासक सुनंदा भोसेकर आणि आघाडीच्या ललित लेखिका राणी दुर्वे या दोघी ‘मोगरा फुलला’ या नावाचे नवे दालन घेऊन थिंक महाराष्ट्र वेबपोर्टलच्या समूहात दसऱ्यापासून सामील होत आहेत. दालनात संवेदनाक्षम व जाणीवसमृद्ध अशा अनेक लेखकांचे विविध विषयांवरील साहित्य/कला/विचारसमृद्ध असे लेखन तेथे प्रसिद्ध होईल. त्यामधून सद्भावना व सुसंस्कृतता या गुणांचा परिपोष व्हावा आणि मराठीतील समृद्ध सांस्कृतिक जग पूर्वगुणवत्तेने प्रकट व्हावे असा प्रयत्न आहे...