Home Authors Posts by नितीन अनंत साळुंखे

नितीन अनंत साळुंखे

3 POSTS 0 COMMENTS
नितीन अनंत साळुंखे हे बँकेत नोकरी करत असताना त्यांना मुंबईच्या इतिहासाच्या अभ्यासाचा छंद जडला. त्यांनी नोकरी सोडून तोच ध्यास धरला आहे. त्यांचे मुंबईसंबंधातील लेखन नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते. त्याखेरीज त्यांचा ब्लॉग आहे. त्यांचे 'अज्ञात मुंबई' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते मुंबईच्या अभ्यासाखेरीज ललित लेखन, आत्मकथनांचे शब्दांकन अशी कामे करतात. ते मुंबईतील दहिसर येथे राहतात. 9321811091

‘कोर्सले’चा झाला ‘सह्याद्री’ आणि ‘डनवेगन’ चा ‘वर्षा’ (Corsley and Dunvegan Bungalows)

मुंबई बेटाच्या गेल्या दोन-तीन शतकांचा इतिहास मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर लपलेला आहे. शोधणाऱ्याला तो सापडतो.  हे शोधकार्य रोमांचक आणि मनोरंजक तर आहेच पण त्यातून ज्ञान आणि...

बेलासीस रोड

स्थानिक इतिहास ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची शाखा आहे. मुंबईच्या इतिहासाचा विविध अंगांनी अभ्यास करणारी काही पुस्तके इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये गेल्या दहा वर्षांत आली आहेत. तरुण अभ्यासक पुढे येत आहेत. अनेक मनोरंजक कथा समोर आल्या आहेत. ‘मोगरा फुलला’ या दालनात वेगवेगळे लेखक ‘ये है मुंबई मेरी जान’ या सदरामध्ये मुंबईविषयी लेख लिहितील. यांतील पहिला लेख नितीन साळुंखे यांचा...

घरासाठी पागडी आली कोठून? (The Origin of Pagadi for Residence in Mumbai)

'पागडी' हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा शब्द. तो पुनर्विकास आणि त्यातून मिळणारी ओनरशिप घरे या काळात विस्मृतीत गेला आहे. एकेकाळी मुंबईत घर पागडीनेच मिळायचे. 'पागडी'ची घरे म्हणजे भाड्याने घेतलेली घरे. घरमालक किंवा चाळमालक त्याच्या मालकीच्या जागेवरील किंवा चाळीतील घरे गरजूंना भाड्याने देई...