Home Authors Posts by शैलजा शिवाजी औटी

शैलजा शिवाजी औटी

1 POSTS 0 COMMENTS
शैलजा औटी या मराठी साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांचे महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’संबंधीचे शैलीविषयक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या पुस्तक परीक्षणे, प्रवासवर्णन, प्रौढ नवसाक्षरांसाठी चळवळविषयक लेखन करतात. त्यांना लोकसंस्कृती, भाषा, निसर्ग यांच्या अभ्यासाची आवड आहे.

ओतूरची सांदुरी पुरी

पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर - महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. त्या साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे...