Home Authors Posts by नंदिनी आत्मसिद्ध

नंदिनी आत्मसिद्ध

3 POSTS 0 COMMENTS
नंदिनी आत्मसिद्ध या लेखिका आणि पत्रकार आहेत. त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग असतो. त्यांनी विविध सामाजिक विषयांवर लेखन केले आहे. महिला हा त्यांच्या अभ्यासाचा विशेष विषय आहे. त्यांचा हिंदी, उर्दू, बंगाली आणि फार्सी साहित्याचा अभ्यास आहे. त्यांनी कविता आणि कथांच्या अनुवादाबरोबर ललित लेखनही केलेले आहे. त्यांची आहारसंस्कृती, विदेशिनी, गीतकार, कारेनामा, कथालोक, रूपेरी गीतगुंजन अशी पुस्तके गाजलेली आहेत.

ओझे, शब्द आणि अर्थ यांचे (Loads of content and context)

शब्दांना अर्थ असतात आणि अर्थांना विविध छटा असतात. संदर्भानुसार अर्थच्छटेत सूक्ष्म फरक होतो. व्यवहारातही एखादा शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. त्यामुळे शब्दांचे अर्थ बरेचदा संभ्रमितही करतात. विविध भाषांमधून एका अर्थासाठी जवळपास सारखे शब्द वापरले जातात. तर कधी कधी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना, वस्त्र बदलावे तसे शब्द अर्थ बदलतात. दुसऱ्या भाषेत गेल्यावर एकातून दुसरा शब्द उमलतो आणि त्याचबरोबर अर्थही बदलतो...

अर्थांनो ! मागुते या !

शब्द आणि अर्थ ही जोडी तशी अतूट. पण कधी कधी दोघेही एकमेकांना हुलकावणी देत राहतात. मग कधीतरी कवीला शब्दांना साद घालावी लागते. म्हणून केशवसुत यांनी शब्दांना मागुते म्हणजे मागोमाग येण्याचे आवाहन केले. त्यांनी मनातल्या संवेदनांना आकार द्यावा, म्हणून शब्दांची विनवणी केली. तर विंदा करंदीकरांना मनातले अर्थ चिमटीत पकडायला, त्यांना आकार द्यायला शब्द अपुरे पडताहेत, असे जाणवले आणि ते लिहून गेले...

प्रवास शब्दांचे आणि अर्थांचे

नंदिनी आत्मसिद्ध या बहुभाषाविद्वान आहेत. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर प्रभुत्व आहे. त्याचबरोबर त्यांचा कन्नड, बांग्ला, उर्दू आणि फार्सी या भाषांचाही अभ्यास आहे. त्या ‘मोगरा फुलला’च्या वाचकांसाठी शब्दांच्या व्युत्पत्ती, त्यांचा प्रवास याविषयी लिहिणार आहेत. या मालिकेचे शीर्षक आहे ‘शहाणे शब्द’. त्यातील हा पहिला लेख...