Home मोगरा फुलला

मोगरा फुलला

मुलांचे वाचन – एक विचार (Natural Learning a thought)

8
मुलांचे वाचन म्हणजे अर्थातच त्यांची वाचायला शिकण्याची प्रक्रिया. या विषयावर बोलायला सुरुवात अगदी प्राथमिक पातळीवरून करूया. वय वर्षे तीन ते सहा ह्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणाला बालशिक्षण असे म्हणतात. ह्यालाच 2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षण असे म्हटले आहे. ह्या पायाभूत शिक्षणाचे किंवा बालशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हे आहे...

स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears...

ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...

कारी कारी बादरिया – मल्हार ! (Monsoon clouds and Raga Malhar)

यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते. मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली 'मल्हार जॅम' ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील...

मधुवंतीची मोहिनी (Raga Madhuvanti)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची मालिका सुरु करण्यामागचा उद्देश शास्त्रीय संगीतातले बारकावे विशद करून सर्वसामान्य रसिकांना त्याचा  आस्वाद घ्यायला मदत करावी, हा होता....

महाराष्ट्र देशा (My Maharashtra)

29
आमचे गाव सिद्धेश्वर. अंतर पालीपासून दोन किलोमीटर. सिद्धेश्वर हे दुर्वे कुटुंबीयांचे मूळ गाव. त्यामुळे पालीमधील अष्टविनायक आणि देवळामागे उभा असलेला सरसगड अंगणात उभे असल्याप्रमाणे ओळखीचे. पाली या एका गावात इतके काही विखुरलेले, लिहिण्याजोगे आहे तर छत्तीस जिल्हे, तीनशेअठ्ठावन्न तालुके आणि त्यातील सुमारे पंचेचाळीस हजार गावे मिळून बनलेल्या महाराष्ट्रात लिहिण्याजोगे, नोंदी करण्याजोगे किती असेल ! वाटले, ‘मोगरा फुलला’ निमित्ताने उभा महाराष्ट्रच लिही म्हणून मला खुणावत आहे का? ही एक नवी सुरुवात तर नव्हे ?...

समर्पण – डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची जीवनगाथा (Samarpan, Biography of Dr. Dwarkanath Kotnis)

1
डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे नाव आज साठीत असलेल्या पिढीला सहज माहीत असते. अनेकांनी व्ही. शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’ हा सिनेमाही पाहिलेला...

कहीं ये वो तो नहीं ?… भाग दोन (Musings)

ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत...

गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती (Borrowing Gazal Ideas)

‘गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती’ हे लेखाचे नाव थोडे विचित्र वाटू शकेल. प्रत्येक भाषेची स्वत:ची संस्कृती असते. उर्दूमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या कवी/शायर यांच्या गझलमधल्या ओळी घेऊन त्यापुढे स्वतःच्या ओळी जोडण्याची सर्रास पद्धत आहे. यात वाङ्मयचौर्य वगैरे न समजता ही ज्येष्ठ कवीला दिलेली मानवंदना आहे असे समजतात. हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार देवमणी पांडेय यांच्या ह्या लेखाचे मराठी कवयित्री रेखा शहाणे यांनी भाषांतर केले आहे. अनेक सुप्रसिद्ध गझल आणि गीतांमधील देवमणी पांडेय यांनी दाखवून दिलेले साम्य मननीय आहे...

कथा, सामा वेलादीच्या पराक्रमाची ! (The story of Adiwasi youth who got British Albert...

6
राज्यातील अतिमागास, दुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात ‘जॉर्जपेठा’ व ‘ग्लासफर्डपेठा’ नावाची दोन गावे आहेत. ‘जॉर्जपेठा’ हे नाव ब्रिटिश वन अधिकारी ह्यू शॉ जॉर्ज यांच्या नावावरून पडले आहे. ‘जॉर्ज’ यांच्या जीवनातील ही सत्यकथा रोमहर्षक आणि तितकीच चित्तथरारक आहे. ती 1924 च्या सुमारास, म्हणजे शंभर वर्षांपूर्वी घडली. ती सत्यकथा गडचिरोली (विभाजनपूर्व चांदा) जिल्ह्यातील अतिदुर्गम, घनदाट जंगलातील गर्द, निबिड अरण्यात अशा प्रकारे गुडूप झाली की तिचा पुढे मागमूसही उरला नाही ...

मुंबई नगरीतील महापालिका (Brihanmumbai Mahanagarpalika Building in Mumbai)

1
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लांबलचक नावाच्या रेल्वेस्टेशनवर पहिल्यांदा उतरणारा माणूस अनेक गोष्टींना बिचकतो, चकित होतो. मग ती त्या स्टेशनची भव्य इमारत, तिथली गर्दी असो की स्टेशनबाहेर पडल्यावर दिसणारी मुंबई महापालिकेची इमारत ! स्टेशनच्या दोन्ही दिशांना अनेक वारसा इमारती म्हणजे हेरिटेज बिल्डिंग्ज आहेत, ज्या आवर्जून बघायला हव्यात. त्यातील अनेक इमारतींमध्ये सर्वसामान्य मुंबईकर काम करत असतात पण ते रोजच्या जगण्याच्या लढाईत इतके गुंतलेले असतात की स्वतःच्या कार्यालयाची इमारतही ते साक्षेपाने बघत नाहीत. ‘मुंबई नगरीतली महापालिका’ या लेखात मुंबई महापालिकेच्या भव्य ऐतिहासिक इमारतीचा इतिहास आणि वर्तमान स्थिती याविषयी माहिती दिली आहे...