कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

कर्जतचा एव्हरेस्टवीर संतोष दगडे (Karjat youth climbs Everest peak)

संतोष लक्ष्मण दगडे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतचे तरुण गिर्यारोहक 17 मे 2023 रोजी पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी एव्हरेस्टवर पोचले ! महाराष्ट्राच्या या युवकाने या पराक्रमामुळे साऱ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्यासारखे दिग्गज जेथे पोचले तेथे मराठमोळे संतोष जीवाची बाजी लावून पोचले होते...

दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)

दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते व्यवसायानिमित्ताने आले आणि त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली...

साखरवाडी – खो खो ची पंढरी

जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत...

कुस्तीवीर सुधीर पुंडेकर याचे क्रीडाकेंद्र (Wrestler Sudhir Pundekar’s Sports Center)

सुधीर पुंडेकर याने बेल्ट रेसलिंग या कुस्तीप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहे. तो खेळतो उत्तम; त्याचे खेळण्यावर प्रेम आहे आणि तो स्पर्धा खेळतो तेव्हा त्याला ती देशसेवा वाटते ! तशा उदात्त भावनेने तो या एकूण व्यवहाराकडे पाहतो. तो मूळचा फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या छोट्या गावचा. शेतकरी कुटुंबातील. त्याने कुस्तीबरोबरच इतर क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारे केंद्र गावात सुरू केले आहे...

अप्रकाशित हिऱ्यांना पैलू पाडणारी शाळा (The school that anvils undiscovered diamonds)

2
ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना शहरातील अनेक गोष्टींबद्दल कुतूहल असते. किंबहुना ते अप्राप्य असल्याची जाणीवही मनात असते. उभरत्या मुलांच्या मनात कोणताही गंड राहू नये, या भावनेने त्यांना योग्य संधी, योग्य मार्गदर्शन देण्याची कळकळ शिक्षकांच्या मनात असेल, तर मुलामुलींचे निरोगी फुलासारखे फुलणारे व्यक्तिमत्त्व तयार होते. जितेंद्र पराडकर यांच्यासारखे शिक्षक पैसा-पैसा जमवून विद्यार्थ्यांसाठी ‘पैसा फंड कलादालन’ उभे करतात त्याची ही गोष्ट....

अर्पण करू…

आसावरी काकडे यांची आत्मचिंतनात्मक कविता वाचली. इंग्रजी साहित्यामध्ये ‘ड्रॅमॅटिक मोनोलॉग’ नावाचा एक काव्यप्रकार आहे. तो नावाप्रमाणेच, स्वतःशी केलेला संवाद असतो. त्याच्या सादरीकरणात शेजारी श्रोता आहे, हे गृहीत धरलेले असते. श्रोता बोलणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकत असतो, पण त्यावर प्रतिक्रिया मात्र देत नाही किंबहुना स्वतः बोलत नाही. अगदी त्याचप्रमाणे, आसावरी काकडे यांच्या ‘अर्पण करू’ या कवितेतली व्यक्ती समाजमनाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दिसते...

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...

पाखरा – जव्हार पाड्याच्या मुलांचे पुस्तक !

पालघर जिल्ह्याच्या जव्हार पाडा भागातील मुलांनी पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांना दिसणाऱ्या पक्ष्यांविषयी तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले गेले आहे. त्यांची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत...

वस्तीमधील उमलणारी फुले

स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...

बाळकोबा नाटेकर – शाकुंतलातील कण्व (Veteran Stage Actor Balkoba Natekar)

0
अण्णासाहेब किर्लोस्कर यांना लाभलेले एक ज्येष्ठ गायक नट म्हणजे बाळकोबा नाटेकर. ते पदांना सानुकूल चाली लावण्यासाठी प्रसिद्ध होते. साक्या-दिंड्यांना वेगवेगळ्या चाली लावण्याचा पहिला मान बाळकोबा यांचा होता. तल्लख स्मरणशक्ती आणि विलक्षण ग्रहणशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये होती…