कला

महाराष्‍ट्रातील कलात्‍मक प्रतिभा, त्‍याचा इतिहास आणि वर्तमान!

भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...

पोस्टर व बॅनर चित्रकला लोपली !

घराणी सिनेमाक्षेत्रात अनेक होऊन गेली; अजूनही आहेत. सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय ही क्षेत्रे कमीजास्त ग्लॅमरची; लोकांच्या मनी आकर्षण असलेली. परंतु त्या कलावंतांची तशी प्रसिद्धी करणारे जे चित्र कलाकार पडद्यामागे काम करतात ते मात्र दुर्लक्षित राहतात, उपेक्षित असतात. चित्रपटनिर्मितीचे श्रेय दादासाहेब फाळके यांचे. पण चित्रपटाला वास्तववादी चौकट दिली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी. पोस्टर व बॅनर चित्रकलेतील 1924 ते 1989 ही पासष्ट वर्षे म्हणजे रंगरेषांचा ‘महायज्ञ’च होता. तो 1990 नंतर निवांत झाला, असे वर्णन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी सुबोध गुरुजी यांनी संकलित केलेल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केले आहे. सुबोध गुरुजी यांनी स्वत: त्यास ‘मानवी स्पर्श संपला’ असे समर्पक रीत्या म्हटले आहे...

दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)

महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...

अनाहत शंकरा (Raga Shankara)

अनाहत या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे, स्वयंभू, ज्याच्यावर कसलाही आघात झालेला नाही असा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला शंकरा हा राग हा असाच एखाद्या स्वयंभू, बलदंड खडकाप्रमाणे आहे. या रागाची माहिती करून देत आहेत डॉ. सौमित्र कुलकर्णी. शास्त्रीय संगीताविषयीच्या त्यांच्या लेखमालिकेतला हा चौथा लेख...

नवचित्रकला (Modern Art)

सर्वसामान्यपणे नवचित्रकला ही अगम्य आहे, ती आपल्याकरता नाही अशी समजूत असते. ती समजत नाही असे गृहीत धरून तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तिची थोडी हेटाळणी...

कलगी तुरा (Kalagi Tura)

(Kalagi Tura) ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. तमाशाचा फड असावा तसाच फड पण...

थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...

मैफल रागसंगीताची !(Classical Music Consort)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची लेखमाला सुरू करण्याचा उद्देश श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातल्या काही संकल्पना सांगाव्या, शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला साहाय्य करता आले तर करावे हा आहे. या लेखात ते सांगत आहेत, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची मांडणी कशी असते, मैफिलीत गायल्या जाणाऱ्या रचनांचे स्वरूप कसे असते याविषयी. काही संज्ञा, शब्द; जे वारंवार शास्त्रीय संगीताच्या संदर्भात कानावरून जातात त्या संज्ञांचे, शब्दांचे अर्थही त्यांनी उलगडून सांगितले आहेत. या माहितीचा उपयोग मैफिलीचा आनंद घेताना होईल...

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...

राग संगीत हेच भावसंगीत

सर्वसामान्य माणसांच्या मनात गणिताविषयी जशी एक भीती किंवा हवेतर अढी म्हणू तशीच शास्त्रीय संगीताविषयीही असते. हे आपल्याला समजणार नाही अशी एक समजूत असते. अनेकांना ते ऐकायला आवडते पण ‘समजत’ नाही. शास्त्रीय संगीतातले बारकावे समजले तर ते ऐकताना त्याचा आस्वाद अधिक समृद्ध करणारा असेल अशा विचाराने या क्षेत्रातल्या विविध संकल्पना, राग, त्यांचे स्वरूप याविषयी लिहित आहेत तरूण गायक डॉ. सौमित्र कुलकर्णी...