Home Authors Posts by आसावरी काकडे

आसावरी काकडे

1 POSTS 0 COMMENTS
आसावरी काकडे या मराठी आणि हिंदी भाषांतील कवयित्री आहेत. त्यांचे बालगीतसंग्रह आणि लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी अथाह या नेपाळी कादंबरीचा अथांग या नावाने अनुवाद केला आहे. त्यांना मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाचा बालकवी पुरस्कार व हिंदीतर भाषी हिंदी लेखक पुरस्कार यांचा समावेश आहे. त्या चित्रकारही आहेत. त्यांचा ‘मौनरंग’ हा एक चित्रसंग्रह आहे.

अर्पण करू…

आसावरी काकडे यांची आत्मचिंतनात्मक कविता वाचली. इंग्रजी साहित्यामध्ये ‘ड्रॅमॅटिक मोनोलॉग’ नावाचा एक काव्यप्रकार आहे. तो नावाप्रमाणेच, स्वतःशी केलेला संवाद असतो. त्याच्या सादरीकरणात शेजारी श्रोता आहे, हे गृहीत धरलेले असते. श्रोता बोलणाऱ्या व्यक्तीचे विचार ऐकत असतो, पण त्यावर प्रतिक्रिया मात्र देत नाही किंबहुना स्वतः बोलत नाही. अगदी त्याचप्रमाणे, आसावरी काकडे यांच्या ‘अर्पण करू’ या कवितेतली व्यक्ती समाजमनाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दिसते...