संगीता सराफ
वस्तीमधील उमलणारी फुले
स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. त्याचे माध्यम नाटक हे होते. नाटक मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम ठरले. त्यातून कार्यक्रमाअंती काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले...