Home Search

पंढरपूर - search results

If you're not happy with the results, please do another search

पंढरपूरची पालवी… स्पर्श मायेचा… (Palawi from Pandharpur)

एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात...

सविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान

महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! ते अनुष्ठान साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील दत्तघाटावर पार पडले. गांधीजींची ती चळवळ सर्वसामान्य माणसाला किती त्याची स्वत:ची वाटत होती, याचे हे उत्तम उदाहरण! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी...

पिंपळगाव – विदर्भातील पंढरपूर ! (Pimpalgaon – Saintly town in Vidarbha)

पिंपळगाव (भोसले) हे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले समृद्ध गाव आहे. परिसरात पाणी मुबलक आहे. शेतजमीनही सुपीक आहे.
carasole-copy

स्वास्थ्यासाठी नाशिककरांची पंढरपूर सायकलवारी

‘नाशिक सायक्लिस्ट’ ही हौशीने सायकल चालवणाऱ्या मंडळींची ऑर्गनायझेशन गेल्या तीन-चार वर्षांत नाशिकमध्ये सक्रिय झाली आहे. नाशिक शहरात सायक्लिस्ट मंडळींची संख्या वाढत आहे. त्यातच महेंद्र...

श्री विठूरायाचे पंढरपूर

पंढरपूर हे दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्र, महाराष्ट्रात पंढरपूरचा पांडुरंग हे प्रसिद्ध व पूज्य देवस्थान आहे. सर्व देवस्थानात प्राचीन देवस्थान आहे. त्याला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर,...
carasole

वालावल चेंदवण – दक्षिणेचे पंढरपूर

3
वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारे टोक. गावाच्या उत्तरेला पाट-चेंदवण सीमा जोडल्या गेल्या आहेत. चेंदवण, हुमरमाला, गावधड ही वाडीवजा गावे समृद्ध,...
carasole

पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ

कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न...

नरसिंग महाराजांच्या नाना लीला

अकोला जिल्ह्यातील आकोटजवळच्या जळगाव (नाहाटे) गावात एक ब्राह्मण वतनदार पाटील होता. ही 1720 पूर्वीची गोष्ट. गावात गवळी लोकांची वस्ती जास्त होती. वतनदार पाटलांच्या पूर्वजांनी तेथे एक गढी बांधली होती. त्या गढीच्या उत्तर बाजूला एक दरवाजा होता. गढीत असलेल्या पाटलाच्या वाड्याला ‘चंदनाचा वाडा’ असे म्हणत. त्यापैकी वाडा वगळता गाव, कोट, बुरूज, विहीर व दरवाज्यांचे अवशेष कायम आहेत. त्याच नाहाटे वंशात पुंजाजी पाटील नामक गृहस्थ होते. त्यांना दोन पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी यमाबाई व कनिष्ठ पत्नी राजुबाई. राजुबाईंचे माहेर जळगाव(नाहाटे)पासून तीन मैलांवरील शिरसोली ग्राम हे होते...

भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)

पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...

माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...