अनिरुद्ध बिडवे
जय देवी… आनंदी – रावरंभारचित आरती (Ravrambha’s devotional poem for Jagdamba)
शक्तिदेवतेचे जगदंबा हे नामांकन महाराष्ट्राने केले आहे. पराक्रमाची जोपासना करणाऱ्या अन्य शक्तिदेवता महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र तिच्या क्षात्रतेजाने अवघा धन्य झालेला आहे ! त्या जगदंबेच्या भक्तीचे वेड महाराष्ट्राच्या रोमरोमात भिनले आहे. रणांगणावर बेफाम तलवारबाजी करणारा हातदेखील तलवार बाजूला ठेवून, या आदिमायेची स्तोत्रे रचण्यासाठी लेखणी धरतो असे उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये तो चमत्कार अठराव्या शतकात घडला. एक सरदार आदिमायेच्या भक्तीने वेडा होऊन, चक्क कवी बनला ! त्या सरदाराचे नाव आहे रंभाजीराव ऊर्फ रावरंभा निंबाळकर...
शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ (The crowning of Shivaji and its meaning)
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अर्थ त्या काळामधील फक्त तिघांना कळला- पहिले स्वत: शिवाजीराजे, दुसरे गागाभट्ट, कारण त्यामुळे काशी मुक्त झाली आणि तिसरा पराभूत औरंगजेब, कारण त्यामुळे भारताच्या विशेषत: उत्तरेकडील वेगवेगळ्या राजांच्या स्वातंत्र्योर्मी जाग्या होत होत्या...
रसिक राजकारणी जानोजी निंबाळकर
जानोजी निंबाळकर हे केवळ समशेरीचे फर्जंद नव्हते, तर ते एक अव्वल रसिक राजकारणी होते आणि राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या ठिकाणी सहसा न आढळणारे साहित्यिक गुण त्यांच्या ठिकाणी वास करत होते, हे त्यांच्या पत्रात आलेल्या काव्यविभ्रमावरून स्पष्ट होते...
कमलादेवीचा कार्तिकोत्सव
रंभाजीराव बंडखोर वृत्तीचे होते. त्यांनी उत्तर आयुष्यात हातातील समशेर खाली ठेवली व लेखणी हातात घेतली. त्यांनी आदिशक्तीचे कलापूर्ण मंदिर करमाळा येथे बांधले. कमलादेवीच्या उत्सवाचा मुख्य दिवस कार्तिक वद्य चतुर्थीस असतो. त्या पूर्वी चार दिवस म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपासून यात्रेची सुरुवात होते...
जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी
जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या चळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…
रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर
न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...
बार्शीचा अंबरीषवरद भगवंत
लोककथेप्रमाणे विचार केला, तर बार्शीचा भगवंत पंढरीच्या विठ्ठलाहून जुना आहे असे जाणवते. भक्ताच्या परित्राणासाठी तो भगवंत शंख, चक्र, गदा व पद्मसहित त्याच्या लाडक्या लक्ष्मीला पाठीवर घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या आधीपासून अद्भुत अशा बार्शीमध्ये उभा आहे.
सविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान
महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! ते अनुष्ठान साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील दत्तघाटावर पार पडले. गांधीजींची ती चळवळ सर्वसामान्य माणसाला किती त्याची स्वत:ची वाटत होती, याचे हे उत्तम उदाहरण! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी...
फ्रेनर ब्रॉकवे आणि सोलापूरची गांधी टोपी
‘सत्याग्रहा’ची विलक्षण देणगी महात्माजींनी जगाला दिली ! त्यामुळे हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळीचे पाठीराखे जगभर निर्माण झाले. साम्राज्यशाहीने अमानुष जुलुमाच्या जोरावर हिंदुस्थानाला पारतंत्र्यात जखडून ठेवले होते...
सोलापूरचे कर्मयोगी रामभाऊ राजवाडे (Solapur Editor Rajwade Got Jail Term in Freedom Struggle)
सोलापूर शहरात 8 मे 1930 रोजी इंग्रजी हत्यारी पोलिसांकडून जालियनवाला बागेची छोटी आवृत्ती घडली होती. सोलापुरात जे हत्याकांड सरकारने घडवले होते, त्याची खबर जगाला नव्हती. पंचवीसाहून अधिक बळी त्यात गेले होते. सोलापूरचे ते गाऱ्हाणे जगाच्या वेशीवर टांगले रामचंद्र शंकर उपाख्य रामभाऊ राजवाडे यांनी. त्यांचे वृत्तपत्र होते ‘कर्मयोगी’ या नावाचे...