Home Authors Posts by रोशनकुमार पिलेवान

रोशनकुमार पिलेवान

5 POSTS 0 COMMENTS
रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ‘ठिगळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी 'आक्रीत', 'पाऊसपाणी' आणि 'हा जीव तुझ्यावर जडला' या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात. 7798509816

झाडीचा हिरा – मानाचा तुरा : हिरालाल पेंटर (Hiralal Painter – Versatile Actor...

हिरालाल पेंटर हा विनोदाची खाण आणि टायमिंगची उत्तम जाण असणारा विदर्भातील कसदार अभिनेता आहे. तो ‘विनोदाचा बादशहा - हिरालाल पेंटर’ म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी या छोट्याशा गावात झाला. तो त्याची ओळख ‘आठवी पास, नववी नापास !’ अशीच करून देतो...

पिंपळगाव – विदर्भातील पंढरपूर ! (Pimpalgaon – Saintly town in Vidarbha)

पिंपळगाव (भोसले) हे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले समृद्ध गाव आहे. परिसरात पाणी मुबलक आहे. शेतजमीनही सुपीक आहे.

झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच – प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)

झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच – त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे – त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो.

वडसा (देसाईगंज) – द झाडीवूड! (WADSA – The Jhadistage)

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे शहर अलिकडे ‘झाडीवूड’ म्हणून नावारूपास येत आहे. मुंबईला जसे ‘बॉलिवूड’, तसे विदर्भाच्या झाडीपट्टीतील वडसा हे ‘झाडीवूड’. बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तर झाडीवूड मात्र नाटकांसाठी.

अनिल नाकतोडे – झाडीवूडचा खलनायक (The Villain of the Jhadistage)

झाडीबोलीच्या नाट्यकलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलिया म्हणजे अनिल नाकतोडे. त्यांचे वडील दाजीबा नाकतोडे हेही गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे.