Tag: Shevgaon
नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. तेथे केदारेश्वरचे जुने मंदिर आहे. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते...
आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची (Abasaheb Kakade : Inspiration from social movements in Kolhapur)
‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...
शेवगावची वीस गावे पाण्यासाठी तहानलेली !
शेवगाव तालुक्यातील वीस गावांची पाणी योजना पंचवीस वर्षे झाली तरी प्रत्यक्षात आलेली नाही; मात्र वीस गावांसाठी पाणी आंदोलन झाले. जायकवाडी धरण बांधताना सरकारने शेवगाव तालुक्याकरता धरणातील 3.8 टी.एम.सी. पाणी राखून ठेवले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यासाठी पंप ‘ताजनापूर’ या गावी बसवला जाणार होता, म्हणून त्या योजनेला ‘ताजनापूर लिफ्ट योजना’ हे नाव पडले. त्यासाठी आंदोलने, चळवळी, संघर्ष सुरू झाला आणि अद्यापही सुरूच आहे...
सदाशिव अमरापूरकर यांचे समाजभान (Sadashiv Amrapurkar His Acting Talent And Social Consciousness)
सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...
माझी संस्था- आबासाहेब काकडे शिक्षण समूह, शेवगाव
शेवगावच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आबासाहेब काकडे यांनी आणली. त्यांना विद्येचे, शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांचे राहणे खेड्यातील पण दृष्टी आधुनिक जगाची होती. त्यांनी ‘माझी संस्था’ ची स्थापना 6 मार्च 1953 रोजी केली आणि तिचे जाळे सारा तालुका आणि जिल्ह्यात काही भागात विणले. साठ वर्षांत शिक्षणाच्या त्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ती संस्था आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह म्हणून ओळखली जाते...
नागलवाडीचा काशी केदारेश्वर
शेवगाव तालुक्याहच्या नागलवाडी या गावचे काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. ते ठिकाण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. चहुबाजूंनी डोंगर व मध्ये दरी; झाडे-वेली यांनी वेढलेला परिसर मन मोहून टाकतो ! मंदिरही सुबक आहे. जवळच पाण्याचे तळे आहे...
प्रशासनातील पुरुषोत्तम – पुरुषोत्तम भापकर
पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे...
शेतकऱ्यांचे स्वप्न जगणारा युवा कृषीसंशोधक – आदिनाथ काटे
आजच्या परिस्थितीत, मला शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित विषयात कारकीर्द करायची आहे असे कोणी म्हणाले तर त्याला समाज सोडाच त्याच्या घरातील लोकसुद्धा वेडा ठरवतील ! पण जिरायत आणि दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील आखेगाव या छोट्याशा गावातील आदिनाथ एकनाथ काटे या युवकाने मात्र तेच स्वप्न पाहिले...
मध्ययुगीन इतिहासाची साक्षीदार हातगावची गढी
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील गढी म्हणजे जुन्या जीवन राहणीचा उत्तम नमुना आहे. हातगाव हे नगरपासून पंच्याण्णव आणि शेवगावपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. छगन राजाराम भराट पाटील (साळुंके) यांना 1370 मध्ये हातगाव येथील वतनदारी मिळाली होती...
बालंबिका देवीचे बालमटाकळी
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...