सुभाष खर्चन
आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे (Abasaheb Kakade : Work to educational activity)
स्वातंत्र्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला तो आम जनांना शिक्षणाचा. बहुजन समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ती उच्चभ्रू सुशिक्षित समाजाकडून नाडली जात होती. आबासाहेबांच्या मनात कार्य करण्याची सामाजिक जाण होती. त्यांनी ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लिग, शेवगाव’ या संस्थेची स्थापना केली ! त्यांनी स्वतःच्या वाड्यात शेवगावच्या जैन गल्लीत मुलांचे पहिले वसतिगृह 1954 मध्ये सुरू केले. त्यांनी त्या वसतिगृहास ‘श्री संत गाडगे महाराज’ यांचे नाव दिले...
आबासाहेब काकडे – सर्वसामान्यांचे नामांकित वकील (Abasaheb Kakade – Lawyer who fought for ordinary...
जगन्नाथ कान्होजी ऊर्फ आबासाहेब काकडे यांनी कोल्हापूर येथून एलएल बी ची पदवी संपादन केली. ते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. तो काळ तसाच भारलेला होता. आबासाहेबांनी देशप्रेमाने डबडबलेल्या, राष्ट्रभावनेने भारलेल्या वातावरणाला डाव्या विचारांची डूब दिली. त्यांनी अडल्या-नाडल्या गरीब शेतकऱ्यांचे वकीलपत्र सर्रास घेतले; गोरगरीब पक्षकारांना मोफत न्याय मिळवून दिला. ‘शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे व सर्वसामान्यांचे नामांकित वकील’ म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध झाले...
आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची (Abasaheb Kakade : Inspiration from social movements in Kolhapur)
‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...