Home Authors Posts by सीताराम काळे

सीताराम काळे

1 POSTS 0 COMMENTS
सीताराम काळे हे भूमि अभिलेख विभागात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात निमतानदार पदावर कार्यरत आहे. त्यांचे शिक्षण एम ए मराठी असे झाले आहे. त्यांनी शेवगावच्या ओम गणेश कला जागृती या नाट्यसंस्थेमार्फत हौशी रंगभूमीवर प्रेमी चतुर प्रिया फितूर, जमल बुआ एकदाचं, काळोख देत हुंकार, सावधान... विनाशकाल येत आहे, भयरात्र अशा अनेक नाटकांत अभिनय केला आहे. तसेच, त्यांनी काही शॉर्टफिल्म व तीन वेबसीरीजमध्येही अभिनय केला आहे. त्यांचे लेख व कविता प्रसिद्ध होत असतात.

नागलवाडीचा काशी केदारेश्वर

शेवगाव तालुक्याहच्या नागलवाडी या गावचे काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. ते ठिकाण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. चहुबाजूंनी डोंगर व मध्ये दरी; झाडे-वेली यांनी वेढलेला परिसर मन मोहून टाकतो ! मंदिरही सुबक आहे. जवळच पाण्याचे तळे आहे...