Tag: Ratnagiri
नाण्यांच्या माध्यमातून अर्थसाक्षरता – जयवंत जालगावकर (Jaywant Jalgaonkar – Bankman loves coins and liquor...
दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँकेच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी आहेत. जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या अशा पाचशेदहा बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत...
कोकणी घराचा नमुना देगावला (Typical layout of a Konkan house at Degaon)
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव गावात 1941 रोजी बांधलेली एक आगळी वास्तू आहे. तीन बाजूंना पऱ्ह्याचे जणू नैसर्गिक कुंपण आणि समोरच्या बाजूला लालचुटुक मातीचा रस्ता… ते गावाच्या मधोमध वसलेले कौलारू घर आहे इंदिराबाई विद्याधर गोंधळेकर यांचे. सध्या तेथे त्यांचा मुलगा अशोक गोंधळेकर एकटे राहतात. ते व्यवसायाने इंजिनीयर आहेत. ते त्यांच्या मुंबईतील व्यवसायातून निवृत्त झाल्यावर वास्तू व बाग सांभाळण्यास गावी परतले...
रावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री
माणूस एखाद्या वैशिष्ट्यानेही अमर होऊन राहतो ! मूळ दापोलीचे रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या येण्याजाण्यावरून लोक घड्याळ लावत असत ! ‘मंडलिकी टाइम’ अशी संज्ञाच दापोलीत प्रसिद्ध होती ! रावसाहेब मंडलिक आले की समारंभाची वेळ झाली असे समजले जाई. रावसाहेबांनी ज्यांच्यासमोर वकिली केली त्या न्यायाधीशांनाही वेळेच्या बाबतीत सवलत नसे...
वीणा खोत – शेतीला ग्लॅमर (Veena Khot – Young Agricultural Graduate goes Back to...
दापोली तालुक्यातील देरदे या छोट्याशा गावातील युवा कृषी पदवीधर वीणा गजानन खोत तिच्या कुटुंबासमवेत फळपिकांचा व्याप सांभाळते. विशेष म्हणजे ती फळपिकांबरोबर शेत शिवारातील जैवविविधता जपण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ती पीक व्यवस्थापनात कृषी विद्यापीठात शिकलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करते. तिने त्या पद्धतीने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस यांचे; तसेच, काही मसाला पिकांचे उत्पादन घेतले आहे...
चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी
झोलाईदेवीचे प्रसिद्ध मंदिर दापोली तालुक्याच्या माटवण या गावी आहे. झोलाईदेवीला दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील चौऱ्याऐंशी गावांची मालकीण म्हणून संबोधले जाते. झोलाईदेवीचा उत्सव होळी पौर्णिमेला धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात पहिली होळी फाल्गुन शुक्ल पंचमीला पेटवली जाते. झोलाईदेवीची पालखी त्यानंतर सहाव्या दिवशी माटवणमधील मंदिरातून निघते...
आठवणीत जपलेली माझी दापोली
माझ्या आठवणीत रेंगाळलेली दापोली मला रोज आठवते. ती दापोली आहे पन्नास-साठच्या दशकातील. माझे एस एस सी होईपर्यंतचे सारे आयुष्य दापोलीत गेले. मी एस एस सी नंतर दापोलीत कॉलेजची सोय नसल्यामुळे मुंबईत आले.तिकडे दापोलीची हद्द सुरू झाली, की काळकाईच्या कोंडावरची असंख्य थडगी दिसू लागत. त्याचप्रमाणे, आजुबाजूच्या शेतांचे दगडी बांध दिसत. काळकाईचा उतार संपला की डाव्या हाताला मशीद आणि मशिदीच्या खालच्या अंगाला खळखळ वाहणारा ओढा होता. थोडे पुढे आले, की दापोलीचे प्रसिद्ध आझाद मैदान दिसे...
दापोलीतील पाखरपहाट
मी दापोलीत 1996 मध्ये स्थिरावलो. मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो...
जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!
दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे...
नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !
ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का ? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे...
प्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच ! (Panhalekaji – Fort with many names)
दापोली तालुक्यातील दाभोळ या जुन्या बंदरातून मालाची आयातनिर्यात मोठ्या प्रमाणात अनेक शतके होत आलेली आहे. बंदरापर्यंत मालाची नेआण पश्चिम घाटापासूनच्या विविध भूप्रदेशांतून नदीमार्गानेदेखील होत असे. त्या मार्गांवरील वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधले. प्रणालक ऊर्फ पद्मनाभ ऊर्फ पन्हाळेकाजी हा छोटेखानी किल्ला त्यांपैकीच एक ...