Tag: आदरांजली
सुनंदाताई पटवर्धन – एक प्रेरणास्थान
सुनंदाताई पटवर्धन यांच्या दुःखद निधनाची (10 जानेवारी 2024) बातमी वाचली आणि हृदयाचा एक ठोका चुकला. सुनंदाताई आणि माझा संपर्क पंधरा वर्षांहून अधिक काळचा. मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन आणि प्रभाकर फाऊंडेशन यांचा प्रतिनिधी म्हणून 2007 च्या सुमारास सुनंदाताई आणि त्यांच्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ संस्थेच्या संपर्कात आलो. सुरुवातीला जव्हार-मोखाडे भागात आदिवासी मुलांना सायकल वाटप, महिलांना घरघंटी वाटप अशा उपक्रमांतून सुनंदाताई यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली...
द.ब. पारसनीस या इतिहासकाराचा जन्म ! (How the historian named D B Parasnis was...
हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी लोकोत्तर स्त्रीरत्ने प्रकाशमान झाली त्या सर्वांमध्ये शेवटचे व शौर्यगुणामध्ये अग्रेसर असे स्त्रीरत्न म्हणजे झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब होत. पारसनीस यांनी झाशीच्या राणीसंबंधीची बारीकसारीक माहिती सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस क्षणोक्षणी, कणाकणाने सोने टिपतो तशी गोळा केली. ती प्रचंड कष्टाने जमवलेली माहिती त्यांनी कल्पकतेने लिहून काढली. त्या बाबतीत पारसनीस यांना प्रतिभेची भरभरून अशी देणगी मिळाली होती...
रावबहाद्दुर कै. सदाशिवभाऊ साठे (Raobahaddur Sadashiv Sathe who made kalyan a modern city)
सदाशिवभाऊ साठे हे स्वकर्तृत्वावर रावबहादूर झाले होते. त्यांनी लिहिलेली रोजनिशी आणि करून घेतलेले वाड्याचे बांधकाम; तसेच, अन्य लग्नकार्य व समारंभ या संबंधात लिहिलेले हिशोब यावरून त्या काळातील जनजीवन आणि महागाई-स्वस्ताई याची नेमकी माहिती मिळते. त्या पार्श्वभूमीवर सदाशिवभाऊ साठे यांचे कार्य आणि कर्तृत्व सहजपणे उठून दिसते...
हायकूकार मनोहर तोडणकर
दाभोळचे कवी मनोहर रामचंद्र तोडणकर हे आयुष्याच्या शेवटपर्यंत रसिकांच्या शोधात असत. शिरीष पै यांनी ‘हायकू’ मराठीत आणला; तोडणकर शिरीष पै यांना गुरुभगिनी मानत. तोडणकर यांनी ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकारावर नंतरच्या आयुष्यात बराच भर दिला. त्यांच्या नावावर ‘हायकूंची हाक’ आणि ‘समाधीचे क्षण’ हे दोन हायकूसंग्रह आहेत. त्यांपैकी ‘समाधीचे क्षण’ हा संग्रह त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आमच्यापर्यंत आला ! तोडणकर यांच्या अंगणात हायकू जणू फुलांसारखे आपले आपण उमलत गेले...
सदाशिव अमरापूरकर यांचे समाजभान (Sadashiv Amrapurkar His Acting Talent And Social Consciousness)
सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...
देगावच्या वहिनी – इंदिराबाई गोंधळेकर (Indira Gondhlekar – Progressive Lady from Degav)
देगाव गावाचा आदर्श; आरोग्याचा, बुद्धिमत्तेचा, सुधारक, पुरोगामी विचारांचा ‘आयकॉन’ म्हणजे इंदिराबाई गोंधळेकर तथा वहिनी. त्यांच्या वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी पतीचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. इंदिराबार्इंनी प्रापंचिक जबाबदाऱ्या निभावताना कर्तव्य हीच देवपूजा, माणुसकी हाच धर्म ही मूल्ये आयुष्यभर जपली...
डॉ. एकनाथ गोळे – कोकणविकासाचा ध्यास !
डॉ. एकनाथ मधुसूदन गोळे हे मुंबईच्या दादरचे की दापोली तालुक्यातील हर्णेचे असा प्रश्न पडावा इतके ते या दोन्ही गावांशी एकरूप झालेले होते. त्यांनी रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस मुंबईत केली, परंतु त्यांनी हर्णे-दापोलीच्या विकासाचा ध्यास आयुष्यभर घेतला. तसे अनेक उपक्रम त्यांनी त्या तालुक्यात केले...
अचलपूरचे लोकनेते भाई सुदाम देशमुख
विदर्भ प्रदेश हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जाई. काँग्रेस पक्षाने कोणत्याही जागेवर कोठलाही उमेदवार उभा करावा, उमेदवार नसेल तर दगड उभा करावा- त्यालाही लोक निवडून देतील असे बोलले जाई ! पण काँग्रेसच्या त्या अभेद्य बालेकिल्ल्याला जणू सुरुंग लागल्याचे वातावरण लोकसभेच्या 1989 च्या निवडणुकीत निर्माण झाले होते. त्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे झुंजार नेते भाई सुदाम देशमुख ...
अचलपूरचे जिंदादिल राजकारणी माधवराव पाटील
अचलपूरचे माधवराव भगवंतराव पाटील हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात कमी वयाचे आमदार होते. ही गोष्ट 1957 मध्ये अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र विधानसभेची. त्यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे होते. व्यासंग प्रचंड होता. त्यांची बुद्धिमत्ता चतुरस्र चाले. त्यांचे वर्णन त्यांचे समकालीन ‘प्रेमळ हृदयाचे धनी’ असे करत...
महिको बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ – बारवाले
बद्रिनारायण बारवाले यांनी उच्च शिक्षित नसतानाही स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात समाजाची गरज अचूक हेरली आणि महिको ही बीज उत्पादनाची कंपनी नावारूपाला आणली. त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. ते शेतकऱ्यांशी शेअर केले व त्यांचे उत्पन्न वाढवले. त्यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही; तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे...